आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prarthana, Vaibhav, Neha And Bhushan Promoted Coffee Ani Barach Kahi

हे स्टायलिश स्टार्स करतायेत आपल्या सिनेमाचे दणक्यात प्रमोशन, पाहा क्लिक झालेले खास PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, नेहा महाजन या कलाकारांची फोटोसेशनमधील छायाचित्रे)
आपल्या जगण्यामध्ये नात्यांचे खूप महत्व आहे. मात्र आधीच्या पिढ्यांमधील नात्यांमध्ये असलेला मायेचा ओलावा, आजच्या नात्यांमध्ये कुठे तरी हरवला आहे. फेसबुक, ट्विटर, चॅटींगच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या संवाद साधाण्याकडे सध्याच्या पिढीचा कल असतो. तरीही आजची जनरेशन नात्यांबद्दल फारच खोलात जाऊन विचार करते. अशाच युवा पिढीच्या जगण्यावर भाष्य करणारा आणि मनोरंजनाचा आस्वाद देणारा सिनेमा म्हणजे 'कॉफी आणि बरंच काही'. येत्या शुक्रवारी म्हणजेच 3 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
सिनेमात प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, नेहा महाजन हे चार तरुण स्टार्स मेन लीडमध्ये आहेत. याशिवाय दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, अविनाश नारकर, संदेश कुलकर्णी, अनुजा साठे, बाप्पा जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या सिनेमात आहेत.
रिलीज डेट जवळ आल्याने प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, नेहा महाजन हे कलाकार सिनेमाचे दणक्यात प्रमोशन करत आहेत. माध्यमांशी संवाद साधणे असो, वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन कॉलेजमध्ये तरुणाईमध्ये जाणे असो, हे स्टार्स आपला सिनेमा प्रमोट करण्याची एकही संधी हातून दवडत नाहीयेत. याशिवाय या चौघांनी खास फोटोशूटदेखील करुन घेतले आहे. या फोटोसेशनमध्ये हे चारही स्टार्स स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, फोटोसेशनमधील प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, नेहा महाजन या स्टार्सचा ग्लॅमरस अंदाज...