आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EXCLUSIVE : Prarthana, Vikas And Avdhoot Play Snooker Game For Divyamarathi.com

EXCLUSIVE : 'तुझ्या विन मरजावाँ' चित्रपटाच्या टीममध्ये रंगला स्नुकरचा डाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः संगीतकार अवधूत गुप्ते, अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता विकास पाटील स्नुकर गेम खेळताना...)

'तुझ्या विन मरजावाँ' हा चित्रपट येत्या शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे आणि सिनेमाच्या प्रमोशनच्या हेक्टिक शेड्युलमधून चित्रपटाच्या स्टारकास्टने मुंबईत चक्क स्नुकर खेळून थोडा श्रमपरिहार केला. चित्रपटातलं लीड कपल नवोदित अभिनेता विकास पाटील आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासह चित्रपटाला रोमॅंटिक म्युझिक देणारे अवधूत गुप्ते हे सुध्दा स्नुकर खेळत होते.
अवधूत या अनुभवाबद्दल सांगतात, “आम्ही तिघं एकत्र फक्त प्रमोशनच्यावेळीच आलो आहोत. प्रार्थनाला तर मी मराठी फिल्म इंडस्ट्रीत ब्रेक दिला असल्याने तिच्याशी गाढ मैत्री आहेच. पण विकासचा आणि माझाही चांगला परिचय आहे. पण या चित्रपटाला फक्त म्युझिकच दिल्याने मी शुटिंगच्यावेळी नव्हतो. आणि त्यामुळे प्रमोशन करता करता असा रिलॅक्सवेळ आम्ही पहिल्यांदाच अनुभवत आहोत. आम्ही कलाकार नेहमीच एकत्र आलो, की एकमेकांना आपल्या प्रतिभेने प्रभावित करतो आणि आताही स्नुकर खेळताना मी ह्या दोघांना म्युझिकल इन्पिरेशन्स देत होतो. तर प्रार्थना तिच्या सौंदर्याने प्रभाव टाकत होती. तर विकासकडनं मला हिरोइझमची इन्पिरेशन्स मिळतं होती.”
प्रार्थना बेहेरे या वाक्याला तोडत सांगते, ” हे बघ, खरं काय आहे माहित आहे का, मी ह्या दोघांना खेळताना चांगलीच भारी पडतं होते. त्यामुळे मी विरूध्द विकास आणि अवधूतसर अशी परिस्थिती होती.” विकास पाटील आणि अवधूत गुप्तेंना खिजवत, आपल्या खास शैलीतलं खट्याळ हसू प्रार्थनाच्या ओठांवर फुलतं.
पंजाबी मुलगी आणि महाराष्ट्रीयन मुलगा यांची प्रेमकहाणी या सिनेमात सर्वांसमोर येणार आहे. या कथानकावरून अवधूत गप्तेंच्याच ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ची तुम्हांला आठवण नाही झाली तरच नवल. पण अवधूत सांगतात,” या कथेची ही वन लाइन सोडली आणि मी आणि प्रार्थना सोडलो, तर या चित्रपटात आणि त्या चित्रपटात काहीच साम्य नाही. जेव्हा फिल्ममेकर्स माझ्याकडे चित्रपटाला संगीत देण्याची ऑफर घेऊन आले, तेव्हा चित्रपटाचे हीरो-हिरोइनही ठरले नव्हते. तेव्हा मीच प्रार्थनाचं नाव रेकमेन्ड केलं आणि म्युझिकबद्दल तर मी सांगेन, की दोन्ही चित्रपटांमधलं वेगळेपण संगीत ऐकताच तुम्हांला ओळखू येतं.”
अवधूतसाठी जरी दोन चित्रपटांचा अनुभव खूप वेगळा असला तरीही, प्रार्थना या चित्रपटाच्या निमीत्ताने पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकली आहे. ती एकदम आठवणी सांगता सांगता उसळून अवधूतला म्हणते, ”तुम्हांला आठवतंय, आपण अमृतसरला ‘केसर दा ढाबा’ला थाळी खाल्ली होती. मी विकासला पुन्हा तिथेच थाळी खायला घेऊन गेले होते. त्याचजागी रबडी खाल्ली जिथे आपण मागच्यावेळी खाल्ली होती.”
विकासची ही पहिली फिल्म. या अगोदर टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यावर चक्क हीरोची भूमिका अचानक ऑफर झाल्यानंतरचा अनुभव तो सांगतो, “प्रार्थनासोबत काम करायचं आहे म्हटल्यावर मला जरा दडपणच आलं. पण प्रार्थनाशी मैत्री झाल्यावर फिल्ममध्ये काम करणं सोप्प गेलं. कोल्हापूर आणि पंजाबमध्ये तर आमची छान बाँडिगच झाली. कोल्हापूर मी तिला दाखवलं तर अमृतसर, वाघा बॉर्डरला ती मला घेऊन गेली.”
अवधूत गुप्ते यावर तक्रार करताना म्हणतात, ”थोडक्यात या सगळ्यागोष्टी मी या फिल्मच्यावेळी मिस केल्या.”
पण अवधूतने केलेल्या या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष करत प्रार्थनाच अवधूतची तक्रार करते, ”अवधूतसरांचा लाडका फक्त एकच अॅक्टर आहे, ज्याचं नांव आहे, संतोष जुवेकर. त्यामुळे ते कधीही आपल्या अभिनेत्रींना पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याचा चान्सच देतं नाहीत. मग तर ते हे फिल्मच्या शुटमधले सगळे अनुभव आणि ही मजा मिस करणारच ना.”
आपण पुरते पेचात अडकलो हे ओळखून, “तुला मी माझ्या पुढच्या फिल्मच्यावेळी नक्की बोलवेन” असं वचन देतं, तिथनं निघून जाण्याशिवाय अवधूतला पर्यायच उरतं नाही. आणि अवधूतसोबत मस्करी करणारी प्रार्थना पून्हा एकदा अवखळपणे हसू लागते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, स्नुकर गेम खेळतानाची या स्टार्सची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे...
(फोटो - अजित रेडेकर)