आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'शनाया\'च्या \'बॉयफ्रेंड\'ला \'या\' व्यक्तीने दिली होती मराठी सिनेसृष्टीत पहिली संधी,

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत शनायाच्या सो कॉल्ड बॉयफ्रेंड श्रेयसची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन देशपांडे हा चेहरा आता मराठी इंडस्ट्रीसाठी नवीन नाही. या मालिकेपूर्वी 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत जान्हवीच्या मित्राची भूमिका सचिनने साकारली होती. पण सचिनला सिनेसृष्टीत पहिला ब्रेक कुणी दिला हे तुम्हाला ठाऊक आहे का... स्वतः सचिनने त्याची सिनेसृष्टीतील प्रवेश कसा झाला, हे सांगितले आहे.
 
सचिनला पहिली संधी देणा-या व्यक्तीचे नाव आहे अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक. प्रसादचा कच्चा लिंबू हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिली होतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने सचिनने प्रसाद ओकला त्याच्या शुभेच्छा दिल्या असून एक पोस्ट शेअर केली आहे. सचिन म्हणतो, "प्रसाद ओक सर... मला चित्रपट क्षेत्रातली पहिली संधी या माणसाने दिली. कुठला ही अनुभव नसताना, कुठली ही ओळख नसताना निव्वळ सचिन गोखलेच्या सांगण्यावरून "हाय काय नाय काय" ह्या चित्रपटासाठी असिस्टंड डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी दिली. माझी सुरुवात तुमच्यामुळे झालीये."

'कच्चा लिंबू' या चित्रपटाचे निर्माते मंदार देवस्थळींचा उल्लेख दादा, मित्र, गुरु = सर्वस्व असा केला आहे. एक दिग्दर्शक म्हणून मी तुझ्या प्रेमात आहेच, पण त्याही पलीकडे खुप काही आहेस तू माझ्यासाठी आणि कायम असशील, म्हणूनच सर्वस्व हयात सगळ आलं, असं सचिन सांगतो.

सचिन पुढे लिहिलो, मंडळी हे सगळं लिहिण्यामागचे कारण इतकच, की माझ्या आयुष्यात Special असणाऱ्या या सगळ्या माणसांचा एकत्र असा एक Special सिनेमा येतोय"कच्चा लिंबू". उद्या 11 ऑगस्टला संपूर्ण भारतात आणि 12 ऑगस्टला भारताबहेर रिलीज होतोय. प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, मंदार देवस्थळी, आकाश पेंढारकर, सचिन खेडेकर. सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम या सर्व कलाकारांना सचिनने शुभेच्छा दिल्या आहेत.  
 
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि बघा, सचिनने शेअर केलेला व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...