आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Look : प्रशांत दामलेंचे नवे कॉमेडी नाटक, ‘गुण्यागोविंदाने’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्माता प्रशांत दामले आणि 'गुण्यागोविंदाने' नाटकाची टीम
प्रशांत दामलें यांचा गेल्या कित्येक वर्षात एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. हा प्रेक्षकवर्ग दामलेंचे नाटक येणार म्हटल्यावर मनोरंजनाची पर्वणी मिळणार ह्याची खुणगाठ बांधलेला रसिक आहे. अनेकजण त्यांचे नाटक येणार म्हटले की, आपल्या विकेन्डच्या प्लॅनमध्ये प्रशांत दामलेंचे नाटक पाहणे हा कार्यक्रम फिक्स करून टाकतात. प्रशांत दामले रंगभूमीवर आले, की हा ‘मेसमरायझिंग एन्टरटेनर’ पूर्णवेळ आपल्याला त्याच्यासोबत एका अद्भूत सफरीवर घेऊन जाणार याची पूर्ण खात्री त्यांच्या चाहत्यांना असते.
प्रशांत दामले यांना अभिनेत्याच्या भूमिकेत आपण अनेक वर्ष पाहिल्यावर आता ते निर्मात्याच्या भूमिकेत शिरलेले आहेत. ‘चंद्रलेखा’ निर्मिती संस्थेद्वारे त्यांनी ‘एकाच माळेचे मणी’ ह्या नाटकाची तीन वर्षापूर्वी निर्मिती केल्यावर आता पून्हा आपल्या संस्थेद्वारे ‘गुण्यागोविंदाने’ हे नवे नाटक घेऊन ते आले आहेत.
लेखक-दिग्दर्शक महेंद्र कदम यांच्या ‘दोन स्मॉल’ ह्या दिर्घांकावर आधारित हे नाटक आहे. स्पर्धेमध्ये ह्या नाटकाला सर्वोत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री आणि नाटक अशी पाच पारितोषिके मिळाली होती. नाटकाविषयी प्रशांत दामले सांगतात,” मला हे नाटक पाहिल्यावर खूप आवडलं. अतिशय चांगली संहिता आहे. सध्या ‘माझं कार्टी काळजात घुसली’ रंगभूमीवर चांगलं चाललंय. हे नवं नाटकही त्याच धाटणीचे आहे. हेही प्रशांत दामले स्टाइलचं नाटक आहे.”
नाटकाचे दिग्दर्शक महेंद्र कदम म्हणतात,” माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक. प्रशांत दामले यांनी ह्या नाटकाला स्पर्धेत पारितोषिके मिळाल्यावर मला बोलावलं आणि हे नाटक आपण व्यावसायिक रंगभूमीवर आणूया असं सांगितलं. प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने मी सुखावून गेलो होतो. आणि ज्या अभिनेत्यांनी हे नाटक स्पर्धेत सादर केले होते. त्याच अभिनेत्यांना घेऊन हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा त्यानी निर्णय घेतला. ते एक उत्तम अभिनेते आहेत. आणि त्याचा फायदा नाटकाला एस्टॅब्लिश करायला झालाय. लोकांची उत्सुकता प्रशांत दामले निर्माता म्हणून ह्या नाटकासोबत असल्याने चाळवली आहे.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, प्रशांत दामले सांगतायत आपल्या नव्या नाटकाविषयी