आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांबडा-पांढरा रस्सावर ताव मारताना प्रथमेश परब सांगतोय, कोल्हापूरमधल्या पावसाळ्याच्या आठवणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमेश परब, यशोमन आपटे आणि भाग्यश्री शंकपाळ तिघंही कोल्हापूरात होते. आणि फेमस तांबडा-पांढरा रस्सावर ताव मारता-मारता त्यांच्या divyamarathi.comशी गप्पा रंगल्या होत्या.
प्रथमेश परब सांगतो, “चिकन मला तसंही खूप आवडतं. त्यात कोल्हापूरला आल्यावर तांबड-पांढरा रस्सा खाणं हे ओघाने आलंच. मी खव्वय्या आहे. इथलं फेमस मटण लोणचं चाखण्यासोबतच भाग्यश्रीच्या ताटातल्या आमरसावरही माझा डोळा आहे.”
भाग्यश्री शंकपाळ आपल्या शाकाहारी ताटातल्या आमरसाचा आस्वाद घेताना म्हणते, “तांबडा-पांढरा रस्सा, मटण-वडे ह्यासाठी प्रसिध्द असलेल्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी आल्यावर मी जेव्हा शाकाहारी जेवण जेवते. तेव्हा आजूबाजूचे मला नेहमीच चिडवत असतात. आता ह्याची मला सवय झालीय. गेल्या पावसाळ्यात आम्ही तिघांनी कोल्हापूरातच सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले. तेव्हाही ह्या दोघांनी मांसाहारी खाताना मी ते खात नसल्याने खूप छळून झालंय.”
एवढावेळ शांत राहून खाण्यात गर्क असलेला यशोमन आपटे ह्यावर म्हणतो ,” खरं तर, खाताना छळ कधी कधी माझा होतो. कारण हे दोघंही कितीही बोलले की, हे दोघंही खव्वय्ये आहेत. तरीही दोघंही कमी खातात. आणि मग कुठेही गेलं तरीही प्रथमेश आणि भाग्यश्रीच्या प्लेट मधलं अर्ध जेवण मी खातो. त्यामूळे आमची फ्रेंडशीप झाल्यापासून, त्यांच्या प्लेटमधलं खाणं, हा तर माझ्यासाठी नियमच झालाय.”
कोल्हापूरातच ह्या तिघांनी गेल्या पावसाळ्यात चित्रीकरण केल्याने त्यांच्या कोल्हापूरमधल्या मजा-मस्तीच्या खूप आठवणी आहेत. त्यातली सगळ्यात जवळची आठवण, सूप पिण्याची आहे. भाग्यश्री सांगते, “कोल्हापूरला भर पावसाळ्यात चित्रीकरण झालं. चित्रीकरणावेळी सकाळी सात ते सातची शिफ्ट असायची. त्यात गारवा असायचा. त्यामूळे दिवसभर आम्ही ब्रेकमध्ये काही ना काही खात असायचो. पावसाळ्यात आम्ही सगळ्यात जास्त प्यायला प्रकार म्हणजे सूप.“
सूप पिण्याच्या कॉमन आवडीमूळे एकदा मात्र ह्या तिघांची चांगलीच पंचाईत झाली. प्रथमेश सांगतो, “पावसाच्या गारव्यात सूपवर आम्ही तिघंही अक्षरश: तुटून पडायचो. आम्हांला एकदा तर ह्यामूळे दिग्दर्शकाचा ओरडाही बसला होता. आम्ही त्यादिवशी सातच्या शिफ्टला आलो, आणि दोन वाजले होते, पोटात कावळे ओरडत होते. आम्ही कोणालाही न सांगता, कँटिनमध्ये सूप प्यायला गेलो होतो. चूक खरं तर आमचीच होती."
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भाग्यश्री, प्रथमेश आणि यशोमनच्या खव्वय्येगिरीचे फोटो
(फोटो - अजित रेडेकर)
बातम्या आणखी आहेत...