आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी युवावर फुलणार एक नवीन प्रेमकथा, वैभव आणि तेजश्री प्रमुख भुमिकेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमाला भाषा नसते , जात नसते , धर्म नसतो...असते ती फक्त भावना .... आणि या एका भावनेच्या भोवती प्रेमी युगलांचं अख्ख आयुष्य एकवटलेलं असतं. झी युवावर आजुपासून म्हणजेच 27 फेब्रुवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9 वाजता एक नवी कोरी प्रेमाच्या विविध गोष्टी सांगणारी मालिका सुरु होत आहे . 
 
प्रेमावर आधारित मालिका
"प्रेम हे " प्रेमात असलेल्या , आणि नसलेल्या प्रत्येकासाठी हि मालिका आहे .प्रेम करणे सोपे आहे पण ते निभावणे तेवढेच कठीण असते, असे म्हटले जाते. तरीही प्रेम करणारे प्रेम करतच राहतात. प्रेम करणा-यांना कोणाचीच काळजी नसते. प्रेम हे केवळ आपल्या जोडीदाराला मिळवणं नसत. त्या व्यक्ती साठी मनाला पटेल आणि नातं टिकवेल असे सर्व करण्याची तयारी असते.
 
ग्रामिण भागातील प्रेमकथा
प्रेमाच्या अश्या असंख्य भावना अनेकांच्या मनात धुमसत असतात. शहरातील लोक बऱ्याच अंशी बोलून मोकळी होतात पण ग्रामीण भागात आजही अनेकांच्या प्रेमकहाण्या या अव्यक्तच राहिल्या आहेत. याच विषयाला धरून "प्रेम हे" या मालिकेची पहिली गोष्ट आहे "रुपेरी वाळूत " एका गावात राहणारे सुनील आणि राधिका ( वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान ) , एकमेकांवर प्रेम तर करतात पण एकमेंकाना व्यक्त होणं तितकसं सोपं नसतं. मग त्यांना जोडणारी आणि त्यांच्यातील प्रेम फुलवणारी गोष्ट म्हणजे एक गाणं "रुपेरी वाळूत ..." आणि ह्या गाण्याबरोबर त्यांचं फुलत जाणार पण अव्यक्त प्रेम... आणि याचबरोबर त्यांच्या प्रेमाच्या आडवं येणार , घर समाज , गाव आणि लग्न.... अशी ही कथा आहे. 
 
हृषीकेश रानडे आणि केतकी माटेगांवकर यांचे शीर्षक गीत
झी युवावरील "प्रेम हे " या मालिकेतील पहिली गोष्ट आहे "रुपेरी वाळूत " . ग्रामीण भागातील अव्यक्त प्रेम भावना अधोरेखित करणारी हि गोष्ट असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिगदर्शन संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी हि कथा लिहिली आहे . समीर पेणकर यांचे संवाद आणि पटकथा आहे . "प्रेम हे" या मालिकेचे संगीत निलेश मोहरीर यांनी केले असून हृषीकेश रानडे आणि केतकी माटेगांवकर यांनी शीर्षक गीत गायले आहे .
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा या मालिकेती कलाकारांचे खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...