आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Premier Of Balkadu Marathi Film Held In Mumbai Last Night

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रंगला \'बाळकडू\'चा प्रीमिअर शो, पाहा ग्रॅण्ड सोहळ्याचे PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरील छायाचित्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदेश बांदेकर, जयवंत वाडकर आणि अन्य, खालील छायाचित्रात- सुरेश वाडकर आणि जयवंत वाडकर, अभिनेता स्वप्नील जोशी)
मुंबईः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर आधारित ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाचा ग्रॅण्ड प्रीमियर सोहळा गुरुवारी मुंबईत झाला. लोअर परळच्या फिनिक्स ‘पीव्हीआर’मध्ये सायंकाळी साडेसहा वाजता मराठी सिनेसृष्टीतील ‘रेड कार्पेट’ सोहळा रंगला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्निक या प्रीमिअर शोला विशेष हजेरी लावली होती. उद्धव ठाकरे यांच्यासह सिनेसृष्टी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांची या सोहळ्याला उपस्थित होती.

या प्रीमिअरला सिनेमाचे सादरकर्ते शिवसेना नेते खासदार संजय राऊत, निर्मात्या स्वप्ना पाटकर, दिग्दर्शक अतुल काळे, अभिनेता उमेश कामत, नेहा पेंडसेसह ‘बाळकडू’ची अख्खी टीम उपस्थित होती.
‘बाळकडू’ हा सिनेमा आज मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 500 सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला पाजलेले अन्यायाविरुद्ध लढण्याचे ‘बाळकडू’ हा या सिनेमाचा आत्मा आहे. ‘तुम्ही बोलवले, मी येतोय!’ ही या सिनेमाची शिवसेनाप्रमुखांच्या आवाजातील टॅगलाइनसुद्धा लोकप्रिय झाली आहे. अजित-समीर या संगीतकार जोडीने स्वरबद्ध केलेला सिनेमातील पोवाडा गाजतो आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बाळकडूच्या प्रीमिअरला पोहोचलेल्या मान्यवरांची खास छायाचित्रे...