आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Celebs Spotted At The Premier Of Marathi Film Coffee Ani Barach Kahi

\'कॉफी आणि बरंच काही\'च्या Screening ला अवरलले मराठीतील लखलखते तारे, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः डावीकडून - सोनाली कुलकर्णी, भूषण प्रधान, प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, नेहा महाजन)

मुंबईः प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान आणि नेहा महाजन स्टारर 'कॉफी आणि बरंच काही' हा मराठी सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सिनेमाच्या रिलीजच्या काही तासांपूर्वी म्हणजेच गुरुवारी रात्री मुंबईतील पीव्हीआर थिएटरमध्ये सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला सिनेमातील लीड स्टारकास्टसोबतच मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती.
कोण-कोण पोहोचले स्क्रिनिंगला?
या स्क्रिनिंगला मितवा या सिनेमात प्रार्थना बेहरेची को-स्टार असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पोहोचली होती. सोनालीने आपल्या मैत्रिणीला तिच्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सचिन खेडेकर, सुयश टिळक, सुनील बर्वे, सचिन पिळगावकर, सुयश टिळक, मधुरा वेलणकर-साटम, अमृता सुभाष, संतोष जुवेकर, श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दिप्ती तळपदे, विद्याधर जोशी, दिग्दर्शक रवी जाधव यांची विशेष उपस्थिती होती. या सर्व सेलिब्रिटींनी या सिनेमाच्या स्टारकास्टला बेस्ट लक दिले.
काय आहे सिनेमाची वनलाईन?
आपल्या जगण्यामध्ये नात्यांचे खूप महत्व आहे. मात्र आधीच्या पिढ्यांमधील नात्यांमध्ये असलेला मायेचा ओलावा, आजच्या नात्यांमध्ये कुठे तरी हरवला आहे. फेसबुक, ट्विटर, चॅटींगच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या संवाद साधाण्याकडे सध्याच्या पिढीचा कल असतो. तरीही आजची जनरेशन नात्यांबद्दल फारच खोलात जाऊन विचार करते. अशाच युवा पिढीच्या जगण्यावर भाष्य करणारा आणि मनोरंजनाचा आस्वाद देणारा सिनेमा म्हणजे 'कॉफी आणि बरंच काही'. सिनेमात प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, नेहा महाजन यांच्यासह दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, अविनाश नारकर, संदेश कुलकर्णी, अनुजा साठे, बाप्पा जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या मराठी स्टार्सची खास छायाचित्रे...