आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive: ‘किल्ला\'च्या प्रीमिअरला अवतरले हिंदी-मराठीतले स्टार्स, राजकुमारला झाला सेल्फीचा मोह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारा, बर्लिनसारख्या मानाच्या चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकाविणारा, ‘इफ्फी’, ‘मामि’ आणि ‘पिफ’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेला अविनाश अरूण दिग्दर्शित ‘किल्ला’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर गुरूवारी मुंबईत झाला. या प्रीमियरला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतले अनेक मान्यवर उपस्थित होते.

चित्रपटाच्या स्टारकास्ट शिवाय शुभांगी गोखले, मृणाल कुलकर्णी, नेहा जोशी विजय पाटकर, प्रसाद ओक, प्रथमेश परब, डॉ. विजया मेहता, वैभव मांगले, सुबोध भावे, पल्लवी सुभाष, स्वानंद किरकरे, महेश कोठारे, गिरीश जोशी, सौरभ गोखले, अंकुश चौधरी, संदेश कुलकर्णी, राधिका आपटे आणि राजकुमार राव चित्रपट पाहायला आले होते.

‘एम. आर. फिल्म्स, जार पिक्चर्स आणि एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी या बालकलाकारांसोबत अभिनेत्री अमृता सुभाष मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटाच्या प्रीमिअरवेळी आलेल्या पाहूण्यांना चित्रपटातल्या बालकलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवरता आला नाही. अगदी राजकुमार रावलाही या मुलांसोबत सेल्फी काढावीशी वाटली आणि त्याने ह्या छोट्या स्टार्सना सेल्फीसाठी आग्रह धरला. राजकुमार राव सारखा हिंदीतला प्रतिथयश कलाकार सेल्फीसाठी आग्रह धरतोय, म्हटल्यावर मुलंसुध्दा हरखून गेली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'किल्ला' बघायला पोहोचलेल्या कलाकारांची खास छायाचित्रे...
(फोटो - प्रदिप चव्हाण)