आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मर्डर मेस्त्री\' सिनेमाचा झाला प्रिमीयर, पाहा कोण सेलिब्रिटी होते उपस्थित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रांती रेडकर आणि मानसी नाईकचा ग्लॅमरस अंदाज
नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस प्रस्तुत 'मर्डर मेस्त्री' हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा प्रिमीयर गुरूवारी रात्री मुंबईत कार्निव्हल सिनेमामध्ये झाला. त्यावेळी चित्रपटाच्या स्टारकास्टसह उर्मिला कानिटकर, आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, विजय पाटकर, पुष्कर श्रोत्री, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जयवंत वाडकर हे सिनेकलावंतही उपस्थित होते.
अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित राहुल जाधव दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, देवेंद्र भगत, क्रांती रेडकर, मानसी नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लोके यांनी लिहिले आहेत
पुढील स्लाइडवर पाहा, कोणते सेलिब्रिटी कोणासोबत आले, प्रिमीयरला एकत्र