आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टाइमपास 2\'चा दणक्यात प्रीमिअर, अवतरले मराठी तारांगण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('टाइमपास 2'च्या प्रीमिअरला उपस्थित असलेले कलाकार)

मुंबईः रवी जाधव यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'टाइमपास 2' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. थिएटरबाहेर या सिनेमाचे हाऊसफूलचे बोर्ड झळकू लागले आहेत. अनेक ठिकाणी या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंग पूर्ण झाल्या आहेत. दगडू आणि प्राजूचे पुढे काय होणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रेक्षकांप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतील स्टार्ससुद्धा दगडू-प्राजूच्या प्रेमकहाणीत पुढे काय ट्विस्ट अँड टर्न्स येणार हे जाणून घेण्यास आतुर आहेत. म्हणूनच 'टाइमपास 2'च्या टीमच्या वतीने शुक्रवारी मुंबईतील प्लाझा थिएटरमध्ये सिनेमाचा भव्य प्रीमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला मराठी तारे-तारका अवतरले होते.
प्रिया बापट, प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, रवी जाधव, मेघना जाधव, प्रिया बापट, वैभव मांगले ही 'टाइमपास 2'ची टीम प्रीमिअरला हजर होती. याशिवाय सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, उमेश कामत, स्पृहा जोशी, जितेंद्र जोशी, सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे, प्रार्थना बेहरे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी प्रीमिअरला उपस्थिती लावली आणि सिनेमाचे भरभरुन कौतुक केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'टाइमपास 2'च्या प्रीमिअर सोहळ्यात क्लिक झालेली मराठी तारे-तारकांची ही खास छायाचित्रे...