आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: प्रियाने घातली होती उमेशला लग्नाची मागणी, बघा मेड फॉर इच अदर या क्यूट कपलचे PIX

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. आज प्रिया आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. 18 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईत जन्मलेल्या प्रियाने मराठीतील आघाडीचा अभिनेता उमेश कामतची आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. मैत्रीतून या दोघांमध्ये प्रेम फुलले. सहा वर्षांच्या मैत्रीनंतर हे दोघे ऑक्टोबर 2011 मध्ये लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. मुंबईत मोठ्या थाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. उमेश प्रियापेक्षा वयाने आठ वर्षे मोठा आहे.
 
divyamarathi.com ला दिलेल्या मुलाखतीत उमेशने आपल्या प्रेमाची गोष्ट सांगितली होती. उमेश म्हणाला होता, ''खरं तर आमच्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम होतं. मात्र विचारायची हिंमत होत नव्हती. रोज आमचं फोनवर बोलणं व्हायचं. पण कधी विचारायची हिंमत झाली नाही. मात्र 9 ऑगस्ट 2016 रोजी प्रियाने न राहावून मला विचारले. त्यावेळी होकार द्यावा, असं मनात आलं होतं. मात्र मी हा विषय जरा ताणून धरायचं ठरवलं. 18 सप्टेंबर 2006 रोजी प्रियाचा वाढदिवस असतो. त्यादिवशी तिला 'हो' म्हणायचं मी ठरवलं. सहा वर्षांनी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. कारण मध्यंतरीच्या काळात आम्हाला दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. करिअरची घडी नीट बसल्यानंतर आम्ही लग्न केले.''
 
पुढील स्लाईड्सवर बघा, मराठी इंडस्ट्रीतील या क्यूट कपलचे रोमँटिक क्षण... 
बातम्या आणखी आहेत...