आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:डेटींगनंतर सहा वर्षांनी विवाहबंधनात अडकले होते प्रिया बापट-उमेश कामत, अशी आहे लव्हस्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मराठी अभिनेता उमेश कामत त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 12 डिसेंबर 1978 साली मुंबई येथे जन्मलेला उमेश आज मराठी इंडस्ट्रीतील एक नामवंत अभिनेता आहे. असंभव, एका लग्नाची तिसरी गोष्ट, शुभंकरोती यांसारख्या मालिकांतून नाव कमावलेला अभिनेता उमेश कामतने अभिनेत्री प्रिया बापटसोबत संसार थाटला आहे. आज प्रिया-उमेश हे मराठीतील एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. सहा वर्षे डेटींगनंतर केले लग्न..

 

प्रिया आणि उमेश हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.

 

उमेश प्रियापेक्षा सहा वर्षाने मोठा आहे..
उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. याची आठवण करत प्रियाने सांगितले होते की, "उमेशने लग्नासाठी फार वेळल घेतला. आमच्या रिलेशनशीपमध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतकी आतूर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते." अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या लग्नाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...