आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priya Marathe And Shantanu Moghe Celebrated Today 4th Wedding Anniversary

4th Wedding Anni: कशी झाली होती प्रियाची शंतनूसोबत भेट, सांगतेय प्रिया तिच्या 'प्रेमाची गोष्ट'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘चार दिवस सासूचे‘, 'कळत- नकळत', 'हा खेळ सावल्यांचा', 'तू तिथे मी' या मराठी मालिकांसह 'कसम से' आणि 'पवित्र रिश्‍ता' या हिंदी मालिकांमुळे घराघरात पोहोचलेलं मराठमोळं नाव म्हणजे प्रिया मराठे. प्रिया आज आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करत आहे. 24 एप्रिल 2012 रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून झाली. श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघेसोबत प्रियाचे अगदी थाटात लग्न झाले.

आज शंतनू आणि प्रियाच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने मैत्रीपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास लग्नाच्या स्टेशनपर्यंत कसा पोहोचला हे सांगत आहोत. स्वतः प्रियाने तिची लव्ह स्टोरी आमच्यासोबत शेअर केली आहे.
चला तर मग शंतनूसोबतच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नाच्या मंडपापर्यंतचा कसा झाला प्रियाचा प्रवास जाणून घेऊयात तिच्याच शब्दांत...