आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिया यांना होता कॅन्सर, या मराठी सेलेब्सपैकी कुणाचा आजाराने तर कुणाचा अपघाती झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिया तेंडलुकर मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव. 19 ऑक्टोबर 1954 रोजी नाटककार विजय तेंडुलकर यांच्या घरी प्रिया यांचा जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी म्हणजे 19 सप्टेंबर 2002 रोजी प्रिया यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 'रजनी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या प्रिया यांना त्यांचे चाहते आजही रजनी म्हणूनच ओळखतात. 
 
रंगभूमीवर गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती.  1973 साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा 'अंकुर' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. याव्यतिरिक्त त्यांनी 'गोंधळात गोंधळ', 'धाकटी जाऊ' आणि 'तूच माझी राणी', 'मुंबईचा फौजदार' यांसारख्या  गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.
 
प्रिया तेंडुलकर भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली होती. प्रिया तेंडुलकर शो, जिम्‍मेदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

वयाच्या 47व्या वर्षी प्रिया यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. वर्षभरातच म्हणजे वयाच्या 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. फार कमी वयातच प्रिया यांनी आया जगाचा कायमचा निरोप घेतला. आज (19 सप्टेंबर) त्यांना या जगाचा निरोप घेऊन 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण कलाकृती आणि लेखनाच्या माध्यमातून त्या कायम आपल्यातच आहेत. 
 
प्रिया यांच्यामाणेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अल्पायुषी ठरले. काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या कलाकारांविषयी माहिती तुम्हाला या पॅकेजमध्ये आम्ही देत आहोत.
बातम्या आणखी आहेत...