आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REVEALED : \'टाइमपास 2\'मध्ये प्रियदर्शन जाधव-प्रिया बापट साकारणार दगडू नि प्राजक्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट)

मुंबई : 'टाइमपास' चित्रपट गाजल्यानंतर रवी जाधव त्याच्या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन करण्यात व्यस्त होते. आता अखेर 1 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या ‘टाइमपास 2’मध्ये दगडूची भूमिका प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ताची भूमिका प्रिया बापट साकारणार आहे.
प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी पहिल्या भागात टीनएजर वयातल्या दगडू आणि प्राजक्ताची भूमिका लोकप्रिय केली होती. त्यानंतर दुसऱ्या भागात तरुण वयात आलेल्या दगडू व प्राजक्ताच्या भूमिकेसाठी अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, सोनाली कुलकर्णी आदींची चर्चा होती. मात्र आता प्रियदर्शन आणि प्रिया बापट या चित्रपटात दिसणार आहेत.
एकीकडे ‘टाइमपास 2’मधून रवी जाधव या दोन्ही कलाकारांना एका वेगळ्याच लूकमध्ये आणत असताना पहिल्या भागात दगडू साकारणाऱ्या प्रथमेश परबला या दगडूच्या भूमिकेमुळे हिंदीमध्ये ब्रेक मिळाला आहे. ‘दृश्यम’ या चित्रपटात तो अजय देवगणच्या मित्राची भूमिका साकारणार आहे.
पुढे पाहा, आत्तापर्यंत रिलीज करण्यात आलेले टाइमपास 2 चे पोस्टर्स...