आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Does Pinga Dance In SLB\'s Marathi Film\'s Wrap Up Party

SLBच्या पहिल्या मराठी फिल्मच्या Wrap up पार्टीत प्रियंका चोप्राने केला \'पिंगा\' डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय लीला भन्सालींच्या पहिल्या मराठी फिल्मचं शुटिंग नुकतंच पूर्ण झालं. चित्रीकरण संपण्याच्या शेवटच्या दिवशी सहनिर्माती शबीना खानने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आपल्या घरी पार्टी दिली. निर्माते संजय लीला भन्साली, सहनिर्माती शबीना खानसह चित्रपटाची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी, अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री स्नेहा चव्हाण, अभिनेत्री अंजना सुखानी, अभिनेत्री समिधा गुरूसह ह्या चित्रपटाची संपूर्ण कास्ट आणि क्रु पार्टीला आले होते.
एवढंच नाही तर, नुकताच भन्सालींच्या बॉलीवूड फिल्म ‘बाजीराव-मस्तानी’नेही बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केल्यामुळे दिपीका आणि रणवीर सोडून चित्रपटाचे अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ सुध्दा उपस्थित होते.
पार्टीविषयी सांगताना अभिनेत्री समिधा गुरू म्हणते, “बॉलीवूडच्या एका मोठ्या यशस्वी फिल्ममेकरसोबत आपण पार्टी करतोय. ह्याचंच अप्रुप होतं. त्यांच्यासोबत मीच काय संपूर्ण टीमने सूध्दा फोटो काढले. आम्ही खरं तर खूप दमलो होतो. कारण पार्टी अगोदर १२ तास आम्ही शुटिंग केलं होतं. पण संजयसरांना पाहताच जोश आला. पार्टीत खूप खाल्लं, फोटो काढले, नाचलो. आणि एकुणच खूप मजा केली.”
अभिनेता स्वप्निल जोशी सांगतो, “खरं तर, अचानक ठरलेली व्रॅप-अप पार्टी होती. पण ‘बाजीराव-मस्तानी’च्या सक्सेसमुळे हळूहळू त्या टीममधले लोकं येऊ लागले. आणि पाहता पाहता मस्त मोठी पार्टी झाली. रात्री १२-साडेबारा नंतर आम्ही निघालो. पण बाजीरावच्या टीमची पार्टी चालूच होती. आम्ही गेल्यावर प्रियंका आली. त्यामुळे तिची भेट होऊ शकली नाही.”
स्वप्ना वाघमारे-जोशी सांगते,”सकाळी सात ते ९ आम्ही शुटिंग केलं होतं. आणि नऊनंतर शबीनाच्या घरी पार्टीला पोहोचलो. खूप दमलो, असलो तरीही शेवटचा दिवस होता. त्यामुळे एकमेकांसोबत राहायचा एक जोश होता.पण शबीनाच्या घरची बिर्याणी खाल्ली आणि आपोआप पोटात अन्न गेल्यावर डोळे मिटू लागले. त्यामुळे आम्ही १२-१ वाजेपर्यंत निघालो. आम्ही निघाल्यावर प्रियंका चोप्रा आली. त्यामुळे तिच्यासोबत फोटो काढले नाहीत. तिने पार्टीत पोहोचल्यावर पिंगा डान्स केल्याचं नंतर कळलं. तो ही पाहणं राहिलं. पण संजयसरांशी खूप गप्पा झाल्या. आणि आम्ही २९ दिवसांत शुटिंग पूर्ण केल्याने त्यांनी आमचं कौतुक केलं.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, Wrap up partyचे फोटो