आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या पहिल्या मराठी फिल्मचा Teaser रिलीज, \'व्हेंटिलेटर\'मध्ये मराठी स्टार्सची मांदियाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळींचा लवाजमा घेऊन अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या मराठी पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूड टू हॉलिवूड सफर करणा-या प्रियांकाची होम प्रॉडक्शन असलेली कंपनी पर्पल पेबल पिक्चर्स धमाल कौटुंबिक विनोदी सिनेमा 'व्हेंटिलेटर' मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकताच या सिनेमाचा पहिला टीजर रिलीज करण्यात आला आहे. या टीजरमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर दिसत आहेत. पहिल्या टीजरवरुन सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात या सिनेमातील दोन गणपतीच्या गाण्यांचा ऑडियो लाँच करण्यात आला होता. 'व्हेंटिलेटर' ही कामेरकर कुटुंबीयांची कथा असून अगदी तीन वर्षांच्या बाळापासून ते घरातल्या प्रौढ व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच आपलंसं करणारा हा परिवार असल्याचे सिनेमात मुख्य भूमिका साकारणा-या अभिनेता जितेंद्र जोशीने सांगितले.
पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओ प्रस्तुत 'व्हेंटिलेटर' या सिनेमाची निर्मिती डॉ. मधू चोप्रा आणि प्रियांका चोप्रा यांची आहे. हिंदी सिनेसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीच या सिनेमाची कथाही लिहिली आहे. या सिनेमाचा विषय कौटुंबिक असून जितेंद्र जोशी यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

पुढील स्लाईडमध्ये बघा, उत्सुकता वाढवणारा 'व्हेंटिलेटर' सिनेमाचा खास टीजर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...