आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रे या सारे या... प्रियांका चोप्राच्या \'व्हेंटिलेटर\'चा Trailer बघा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळींचा लवाजमा घेऊन अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या मराठी पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूड टू हॉलिवूड सफर करणा-या प्रियांकाची होम प्रॉडक्शन असलेली कंपनी पर्पल पेबल पिक्चर्स धमाल कौटुंबिक विनोदी सिनेमा 'व्हेंटिलेटर' मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात निर्माता – दिग्दर्शक आशुतोष गोवाकरीकर 18 वर्षानंतर अभिनय साकारणार आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात या सिनेमातील दोन गणपतीच्या गाण्यांचा ऑडियो लाँच करण्यात आला होता. 'व्हेंटिलेटर' ही कामेरकर कुटुंबीयांची कथा असून अगदी तीन वर्षांच्या बाळापासून ते घरातल्या प्रौढ व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच आपलंसं करणारा हा परिवार असल्याचे सिनेमात मुख्य भूमिका साकारणा-या अभिनेता जितेंद्र जोशीने सांगितले.
या सिनेमात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, संजीव शाह, सतीश आळेकर, अच्युत पोतदार, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, निखिल रत्नपारखी, नम्रता आवटे-सांभेराव, निलेश दिवेकर यांसह अनेक लोकप्रिय कलाकार बघायला मिळणार आहेत. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद राजेश मापुसकर यांचे असून छायाचित्रण सविता सिंह यांचे आहे. सिनेमात दोन गाणी असून ती मनोज यादव आणि शांताराम मापुसकर यांनी लिहिली असून रोहन-रोहन या संगीतकार द्वयीने ती संगीतबद्ध केली आहेत.
पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओ प्रस्तुत 'व्हेंटिलेटर' या सिनेमाची निर्मिती डॉ. मधू चोप्रा आणि प्रियांका चोप्रा यांची आहे. हिंदी सिनेसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीच या सिनेमाची कथाही लिहिली आहे. या सिनेमाचा विषय कौटुंबिक असून जितेंद्र जोशी यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. 4 नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, काय आहे सिनेमाची कथा आणि तिस-या स्लाईडमध्ये बघा सिनेमाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...