आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA सोडून \'काय रे रास्कला\'च्या प्रमोशनला पोहोचली प्रियांका, आईचीसुद्धा होती हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्व बॉलिवूडकर यूएसमध्ये आयफाच्या रेड कार्पेट वॉक आणि परफॉर्मनसच्या तयारीत व्यग्र असताना बॉलिवूडची सर्वात बिझी अभिनेत्री मात्र 'काय रे रास्कला' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत दाखल झाली. इतक्या व्यग्र शेड्यूलमधून आणि इंटरनॅशनल पुरस्कार सोहळा सोडून पीगी चॉप्स मुंबईत काय करत आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यावर प्रश्न केला असता प्रियांकाने 'काय रे रास्कला' चे प्रमोशन आणि खास कुटुंबासोबत वाढदिवसा निमित्त वेळ घालवण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याचे सांगितले. 
 
प्रियांकाने निर्मिती केलेला 'काय रे रास्कला' हा मराठी चित्रपट 14 जुलै 2017 रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या प्रिमीअरवेळी यावेळी प्रियांकाने आई मधु चोप्रासोबत हजेरी लावली. तिला आयफामध्ये गेली नाहीस यावर प्रश्न विचारला असता ती म्हणाली, "मी नेहमीच करते. नॉर्मल गोष्टी करायला बोर होते. खरे सांगायचे झाले तर मला 4 दिवसांची एक लहान सुटी मिळाली आहे आणि मी सतत कामात बिझी असल्यामुळे घरच्यांना वेळ देऊ शकत नाही. मला माझा वाढदिवस घरच्यांसोबत वाढदिवस साजरा करायचा आहे" असे प्रियांकाने सांगितले.
 
 
इतके सांगितल्यानंतरही पुन्हा हाच प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, "प्रियांकाने सांगितले, प्रत्येक कलाकाराने दरवर्षी प्रत्येक अवॉर्ड फंक्शन अटेंड करायलाच हवा का? माझा वाढदिवस आहे आणि मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. याबाबत फार जास्त विचार करु नका." 
 
प्रमोशनल इवेंटमध्ये प्रियांकाने उपस्थित प्रत्येक कलाकाराला स्टेजवर बोलवले आणि कोणाच्याही मदतीशिवाय सर्वांसमोर ओळख करुन दिली. यावेळी टीमला प्रियांकाने फार स्पेशल ट्रिटमेंट दिली यामुळे सर्वच कलाकार फार खूश झाले. 
 
केवळ मराठीच नाही तर प्रियांका हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांवरही काम करत आहे. इंग्लिस चित्रपटांवर काम करण्यास अजून जास्त वेळ लागणार असल्याचे तिने सांगितले. 
 
आसामी चित्रपटाच्या प्रोडक्शनबद्दल प्रियांकाला विचारले असता तिने सांगितले की, "मी जेव्हा मेरी कॉम चित्रपट करत होते तेव्हा मी मेरीशी त्यांच्या चित्रपटसंस्कृतीबद्दल विचारले त्यावेळी तिने त्यांचा भाग याबाबतीत फारच मागे असल्याचे सांगितले. पर्पल पेबल प्रोडक्श कंपनीद्वारे मी नेहमीच नवीन टॅलेंटला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करते. मिस वर्ल्ड असूनही मला चित्रपटात काम करण्यासाठी संघर्ष करावा लागला त्यामुळेच टॅलेंटेड लोकांना मी मदत करावी असे मला वाटते." 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटाच्या प्रिमीअरवेळी उपस्थित कलाकारांचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...