आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE PHOTOS : 'व्हेंटिलेटर'च्या सक्सेस पार्टीत वडिलांचे स्मरण करताना भावूक झाली प्रियांका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वडील अशोक चोप्रा यांना या जगाचा निरोप घेऊन तीन वर्षांचा काळ लोटला आहे. आजही प्रियांकाच्या मनात तिच्या वडिलांच्या आठवणी ताज्या आहेत. वडिलांविषयी बोलताना ती भावूक होत असते. अलीकडेच मुंबईत परतलेल्या प्रियांकाने 'व्हेंटिलेटर' या मराठी सिनेमाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत प्रियांका तिचे वडील अशोक चोप्रा यांचे स्मरण करताना भावूक झाली. प्रियांकाने 'व्हेंटिलेटर' हा सिनेमा तिच्या वडिलांना डेडिकेट केला आहे. 

प्रियांकाच्या अतिशय जवळचा आहे सिनेमा...
प्रियांका सांगते, "हा सिनेमा माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. हा सिनेमा बनवताना आम्ही खूप कष्ट घेतले.  त्याच्या आयडिएशनसाठी आम्ही बराच वेळ खर्ची लावला. एवढी मोठी टॅलेंटेड स्टारकास्टला एकत्र आणले. इतकेच नाही तर न्यूयॉर्कच्या मित्रांसाठी मी सिनेमाचे खासगी स्क्रिनिंग ठेवले होते. तेथील लोकांना आपल्या कल्चरविषयी फारशी माहिती नाही, त्यांना मराठी भाषादेखील समजत नाही. मात्र तरीदेखील त्यांना हा सिनेमा एन्जॉय केला. मी माझ्या प्रॉडक्शन टीम आणि दिग्दर्शक राजेश यांना धन्यवाद देते, त्यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकले." 

सिनेमाच्या स्क्रिप्टसाठी लागला तीन वर्षांचा काळ... 
व्हेंटिलेटर या सिनेमाची कथा वडील आणि मुलाच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. दिग्दर्शक राजेश मापुस्कर प्रियांकाला या सिनेमाची कथा सांगताना भावूक झाले होते. तेव्हाच प्रियांकाने या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. सिनेमाची कथा पूर्ण व्हायला तीन वर्षांचा काळ लागला होता. या सिनेमासाठी मराठी इंडस्ट्रीतील तब्बल 112 कलाकार एकत्र आले होते.  

'व्हेंटिलेटर' सिनेमाला मिळाले तीन राष्ट्रीय पुरस्कार... 
प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, रामेश्वर भगत यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा आणि आलोक डे यांना साउंड मिक्सिंगचा पुरस्कार मिळाला. कौटुंबिक मनोरंजक सिनेमा व्हेंटिलेटरमध्ये आशुतोष गोवारीकर आणि बोमन इराणींसह मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी काम केलं आहे. कौटुंबिक मूल्ये, प्रथा, परंपरा आणि नातेसंबंध यावर व्हेंटिलेटर सिनेमाने प्रकाशझोत टाकला होता. सिनेमाचं रसिकांनी भरभरून कौतुक केले होते.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, प्रियांका चोप्राच्या पार्टीचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...