आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काय रे रास्कला'च्या स्क्रिनिंगला पोहोचले आशुतोष गोवारिकर-शान, प्रियांकाने केले वेलकम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. मधू चोप्रा आणि प्रियांका चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित “काय रे रास्कला” हा सिनेमा 14 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. विशेष म्हणजे प्रियांकाने अलीकडेच तिच्या तिस-या हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पण आपल्या दुस-या मराठी सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी प्रियांका तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत आवर्जुन भारतात दाखल झाली आणि सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचली. शुक्रवारी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला 'काय रे रास्कला'ची संपूर्ण टीम हजर होती. शिवाय प्रियांकाचा पहिला मराठी सिनेमा व्हेंटिलेटरमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आशुतोष गोवारिकरसुद्धा तिला शुभेच्छा द्यायला आवर्जुन स्क्रिनिंगला पोहोचला. गायक शानदेखील यावेळी उपस्थित होता. स्क्रिनिंगला आशुतोष गोवारिकरांसोबतची प्रियांकाची उत्तम केमिस्ट्री बघायला मिळाली.  Movie Review : सवंग कहाणीचा उथळ चित्रपट 'काय रे रास्कला'

गौरव घाटणेकर, नागेश भोसले, निखिल रत्नपारखी, सुप्रिया पाठारे, श्रीकांत मस्की, हर्षल व विकास, सिद्धेश्वर, निहार, अक्षर कोठारी, संकेत तातकणे, भाग्यश्री मोटे, अमोघ चंदन, दीपक जोशी, जयपाल मोरे, नंदू गाडगीळ, पूर्वी भट, विनोद गायकर, तेजस्वी खटल, साइराज जोशी, आशिश शिर्के, ऐश्वर्या सोनार, चेतना शर्मा, संग्राम देशमुख, प्रताप देसाई या कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका असून आय. गिरीधरन स्वामी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 'काय रे रास्कला'साठी अशी झाली गौरवची निवड, रिअल लाईफमध्ये श्रुती मराठे आहे पत्नी

पुढील स्लाईड्सवर बघा, “काय रे रास्कला”च्या स्क्रिनिंगला क्लिक झालेली छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...