आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग रिसेप्शनमध्ये प्रिन्सेस लूकमध्ये दिसली शशांकची पत्नी, बघा NEW PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शशांक केतकर नुकताच लग्नाच्या बंधनात अडकला. व्यवसायाने वकील असलेल्या प्रियांका ढवळेची शशांकने जोडीदाराच्या रुपात निवड केली. 4 डिसेंबर रोजी पुण्यात दोघांचे थाटात लग्न झाले. शशांकचे हे दुसरे तर प्रियांकाचे पहिले लग्न आहे. पारंपरिक पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर दोघांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शन पार्टीचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका प्रिन्सेस लूक अतिशय सुंदर दिसत आहे. 


नऊवारी साडीत खुलले प्रियांकाचे सौंदर्य..
लग्नात प्रियांकाने पिवळ्या रंगाची नऊवारी परिधान केली होती. लग्नविधीनंतर गडद निळ्या रंगाची साडी प्रियांकाने नेसली होती. लग्नानंतर शशांकने सोशल मीडियावर पत्नी प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याने पत्नीविषयीचे त्याचे प्रेम व्यक्त केले. त्याने लिहिले, ''हसणं, आनंदात राहणं, समजून घेणं हे खरंतर सोपं असतं हे जाणवलं तुझ्यामुळे @dhavalepriyanka I Love''  


अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत शशांकचे पहिले लग्न झाले होते. पण फार काळ दोघांचे लग्न टिकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. याचवर्षी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर शशांकने प्रियांकासोबत साखरपुडा केला होता. 


पुढील स्लाईड्सवर बघा, शशांक-प्रियांकाच्या लग्न आणि रिसेप्शनचे नवीन फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...