आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पुढचं पाऊल’मधले स्वप्नाली-बंटी गेले हनिमूनला? पाहा त्यांची गोव्यातली मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पुढचं पाऊल’मध्ये स्वप्नाली-बंटीच लग्न झालेलं आपण नुकतंच पाहिलं. त्यामूळे आता मालिकेत ते काही दिवस दिसणार नाहीयेत. ते हनिमूनला गेलेत, असं दाखवण्यात येणार आहे. आणि काही दिवस मालिकेत इतर काही नवे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
स्वप्नाली आणि बंटीचा ट्रक काही दिवस नसणार, ह्याचा पूरेपूर फायदा ह्या भूमिका करणा-या स्वप्नाली पाटील आणि अभिजीत गुरूने घेतला. दोघांनाही चार दिवस सुट्टी होती. तर दोघंही मस्त गोव्याला भटकून आलेत. ह्या दोघांच्यासोबत मालिकत कल्याणीचा नवरा असलेला अभिनेता संग्राम समेळ आणि अभिजीतची बायको अभिनेत्री समिधा गुरू सुध्दा होती. चौघांनी भरपूर धमाल केल्याचे फोटो दिव्यमराठीच्या हाती लागले आहेत.
ह्या गोवा ट्रिपविषयी विचारल्यावर स्वप्नाली पाटील म्हणते, “आम्ही खरं तर कोल्हापूरला मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेलो होतो. ह्या चित्रीकरणात स्वप्नाली, रूपाली,आक्कासाहेब, कल्याणी आणि देवकीकाकू अशा मालिकेतल्या सर्व बायका तुम्हांला दिसतील. ह्यानंतर मला, अभिजीतला आणि संग्रामला चार दिवसांची सुट्टी होती. तर आम्ही पहिल्यांदा कोल्हापूरला चित्रीकरणावेळी धमाल केली. आणि त्यानंतर कोल्हापूरहून थेट गोवा गाठलं. गोव्याचा प्लॅन अचानक ठरला. आणि अशा अनप्लॅन ट्रिपच ब-यचदा सक्सेसफुल होतात. अगोदरपासून प्लॅनिंग केलं, की आयत्यावेळी गडबड होते. अचानक ठरल्याने बाकी कोणालाही येणं शक्य नव्हतं. तर आम्ही तिघंच गोव्याला जाऊन एक छोटीशी, पण गरजेची असलेली विश्रांती घ्यायचं ठरवलं.”
कोल्हापूरहून गोव्याला गेल्यावर तिथे ह्या तिघांना एका दिवसानंतर अभिजीत गुरूची पत्नी आणि अभिनेत्री समिधा सूध्दा जॉइन झाली. स्वप्नाली सांगते, “आम्ही निघताना समिधाला विचारलं. पण ती सूध्दा डेलीसोपमध्ये बिझी असते. तिला येणं शक्य नव्हतं. पण आम्ही गोव्याला पोहोचलो. आमच्या बॅग्स हॉटेलवर ठेवतच होतो आणि समिधाचा तीन दिवसांची सुट्टी मिळत असल्याचा फोन आला. मग काय रात्रीची दोनची फ्लाइट पकडून समिधा चारला गोव्यात हजर. आणि मग तर आम्ही चौघांनी जी धमाल केलीय, त्याला तोडच नाही.”
गोव्यात काय शॉपिंग केलं, असं विचारल्यावर स्वप्नाली म्हणते, “मी जास्त कपडे वगैरे गोव्यात घेत नाही. कारण त्या वस्तू मुंबईतही मिळतात. पण बाघा बीचच्या मार्केटमध्ये छान एन्टिक वस्तू मिळतात. घरासाठी एक शो-पिस घेऊन आलीय. बाकी खूप भटकलो. आणि खूप खाल्लं. मला पॅराग्लायडिंग आणि स्पीडबोट राइडिंग करायची होती, ते केलं. एकमेकांचे भरपूर फोटो काढले. भरपूर वेडेपणा केला. असा वेडेपणा फक्त मित्रांसोबतच करता येतो. ह्या अगोदर फॅमिलीसोबत आणि नाटकाच्या दौ-यांसाठी गोव्यात आलीय. पण अशी धमाल पहिल्यांदाच केली.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वप्नाली, अभिजीत, समिधा आणि संग्रामच्या गोवा ट्रिपचे फोटो