आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसारखी डायलॉगबाजी तर फिल्म हिट, यशाचे नवे समीकरण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचे 'बजरंगी भाईजान'चे डायलॉग पोस्टर
‘मेरे बारे में इतना मत सोचना मैं दिल में आता हूँ समझ में नही’, ‘एक बार जो मैंने कमीटमेंट कर दी, तो मैं अपने आपकी भी नहीं सूनताँ’, ‘मुझ पर एक एहसान करना, की मुझ पर कोई एहसान ना करना’
हे आणि असे सलमान खानचे अनेक डायलॉग आहेत, जे सलमानच्या फॅन्सचा तोंडी आहेत. गेल्या काही वर्षांत सलमान खानची फिल्म म्हटली की, मग त्याच्या तोंडी अशी काहीतरी संवादफेक असतेच.
सलमानच का, मागच्याच वर्षी रितेश देशमुख स्टारर ‘लयभारी’ चित्रपटानेही हेच दाखवून दिलंय. ‘घंटा नाही तर तंटा नाही’ किंवा ‘आपला हात भारी, लाथ भारी च्यामायला सगळंच लय भारी’असे काही संवाद रितेश देशमुखच्या तोंडी होते. आणि त्यानंतर फिल्म हिट झाली होती.
७० आणि ८०च्या दशकातल्या तडफदार आणि शिट्या अन् टाळ्या पडणा-या पंचलाइन चित्रपटात असण्याचा ट्रेन्ड पून्हा एकदा परतलाय, असंच दिसतंय. कारण आगामी चित्रपट ‘कॅरी ऑन मराठा’मध्येही आपल्याला सध्या प्रोमोमधून अशीच संवादफेक ऐकायला मिळतेय.
‘कोल्हापूरचा मर्दगडी, मालेवाडी आपलं गांव, भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नांव’ आणि ‘मुक्का असो नाही तर डायलॉग लक्षात राहिला पाहिजे’ असे वनलाइनर्स यात आहेत.
याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लोंढे यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणतात,”चित्रपट लोकांना लक्षात राहतो, तो त्यातल्या वनलाइनर्सच्यामूळे. आपल्याला आजही पूर्वीचे अनेक चित्रपट आठवतात, ते त्यातल्या लोकप्रिय संवादांमूळे. आणि आपली मराठी भाषा एवढी समृध्द आहे की यात अशा अनेक पंचलाइन लिहील्या जाऊ शकतात. म्हणूनच फिल्मचे संवाद लिहीताना संवाद लेखक हृषिकेश कोळीने वनलाइनर्सना प्राधान्य दिलं. आजकालच्या तरूणांना चित्रपट पाहायला सिनेमाहॉलपर्यंत घेऊन यायचे असेल तर हे डायलॉगच उपयोगी पडतात.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कॅरी ऑन मराठातल्या कॉन्ट्रोव्हर्शिअल डायलॉगबद्दल