आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिल दोस्ती...'मधील 'आशु'ला लागली आहे बॉलिवूड सिनेमाची लॉटरी, जाणून घ्या फिल्मविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः तरुणाईची मालिका म्हणून गाजलेल्या 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत स्वच्छंदी आयुष्य जगणारा, मित्रांसाठी वाढदिवसाच्या पार्टीज आयोजित करणारा, आपल्याला नेमून दिलेले काम निमुटपणे पार पडणारा, प्रत्येकाच्या मदतीला धावणारा आशु आठवतोय ना तुम्हाला... सुजय, अॅना, रेश्मा, मीनल आणि कैवल्य या मित्रांसोबत आनंदात जगणारा, त्यांच्या सुख-दुःखात त्यांना साथ देणाला हा आशु मित्रांसोबतच प्रेक्षकांचा फेव्हरेट बनला.
आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून या मालिकेचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिनेच ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु होती. मात्र ठराविक एपिसोड्सनंतर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे आता या सगळ्यांच्या कमबॅकची वाट त्यांचे चाहते बघत आहेत. मालिकेचे दुसरे पर्व सुरु व्हायला अजून थोडा अवकाश आहे. मात्र त्यापूर्वीच आशु अर्थातच अभिनेता पुष्कराज चिरपुटरकरला बॉलिवूड सिनेमाची लॉटरी लागली आहे. हो बरोबर वाचलं तुम्ही... पुष्कराज लवकरच बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 5 ऑगस्टला त्याचा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी पुष्कराजला मिळाली आहे.

चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात, पुष्कराजच्या बॉलिवूड सिनेमाविषयी... आणि हो सोबतच वाचा, पुष्कराज खासगी आयुष्यात कसा आहे.... शेवटच्या स्लाईडवर बघा, पुष्कराजची भूमिका असलेल्या सिनेमाचा ट्रेलर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...