आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा.. दिल, दोस्ती, दुनियादारी! वाचा चाहत्यांच्या मनात काय-काय चाललंय..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या पहिल्या पर्वामध्ये या मालिकेला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले होते. आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना ही सगळीच कॅरेक्टर्स अवघ्या महाराष्ट्रामध्ये कुटुंबाचा एक भागच बनली होती. लहान थोर सगळ्यांनाच या मालिकेने वेड लावले होते. पण दुसरा भाग लवकर घेऊन येणार असल्याचे सांगत मालिकेचा पहिला भाग लवकर संपवण्यात आला. प्रेक्षकांना मात्र ही मालिका कधीही बंद होऊ नये असेच मनापासून वाटत होते. त्यामुळे मालिकेचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. त्यात काही दिवसांपूर्वी कैवल्य आणि आशु या दोघांनी लवकरच प्रेक्षकांना भेटायला येतोय असे संकेत सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे थ्रीडीचे दुसरे पर्व लवकरच सुरू होणार असे अंदाज बांधायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात चाहत्यांना काय काय बघायला आवडेल हेदेखिल समोर येत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना काय बघायला आवडेल त्यांना कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत हे मांडले आहे. तला तर मग पाहू दिल, दोस्तीच्या पुढ्च्या सीझनमध्ये प्रेक्षकांना काय पाहायचंय...

पुढील स्लाइड्सवर वाचा, दिल दोस्तीच्या चाहत्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...