आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 9 : लातूरची शिक्षिका जिंकली 6.40 लाख, बिग बी समोर मांडल्या नॉन ग्रँट शिक्षकांच्या वेदना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लातूरच्या जयश्री जाधव यांनी 'कौन बनेगा करोडपती' मध्ये नुकतेच 6.40 लाख रुपये जिंकले. त्यांनी 11 प्रश्नांची योग्य उत्तरे देत ही रक्कम जिंकली. पण 12 व्या प्रश्नावर त्या अडखळल्या आणि लाईफलाईन शिल्लक नसल्याने त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. जयश्री एका नॉन ग्रँटेड शाळेत शिक्षिका आहेत. त्या 2012 पासून शिक्षिका म्हणून काम करत आहेत. पण आतापर्यंत त्यांना एक रुपयाही पगार मिळालेला नाही. 
 
बिग बींनी केले कौतुक..
जयश्री एका नॉन ग्रँट शाळेवर शिक्षिका म्हणून काम करतात. पण त्यांना पगार म्हणून एक रुपयाही मिळत नाही. उलट त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत  जाण्याचे अंतर 45 किमी आहेत. त्यामुळे जायला यायला त्यांना खिशातून 105 रुपये रोजचे खर्च करावे लागतात. तरीही देशसेवा म्हणून शिक्षणाचे काम करत असल्याचे जयश्री यांच्या पतीने यावेळी सांगितले. त्यावर अमिताभने या दोघांचेही कौतुक केले. तसेच जयश्री यांच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतलेल्या त्यांच्या वडिलांचेही बिग बींनी तोंडभरुन कौतुक केले.
 
100 टक्के पगार मिळण्यासाठी 5 वर्षे पाहावी लागणार वाट.. 
जयश्रीने अमिताभ यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, त्यांना शिक्षिका म्हणून काम करायला पाच वर्षे झाली आहेत. आता जर सरकारने ग्रँट दिले तर त्यांना सरकारकडून पगार सुरू होईल. पण पहिल्या वर्षी 20 टक्के, त्यानंतर दरवर्षी 20 टक्क्यांनी वाढून त्यांना पाचव्या वर्षी पूर्ण 100 टक्के पगार त्यांना मिळू शकेल. 

पतीने शिक्षणासाठी दिले प्रोत्साहन 
- जयश्री यांच्या मते त्या 12 वी पास झाल्यानंतर त्यांचे लग्न रामराव जाधव यांच्याशी झाले होते. 
- लग्नानंतर त्यांच्या पतीने त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्या शिक्षिका बनल्या. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जयश्री यांना अमिताभ यांनी विचारलेले 12 प्रश्न...
बातम्या आणखी आहेत...