आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'राधा प्रेम रंगी रंगली\' मालिकेत जमली सचित-वीणाची जोडी, असा आहे तरल-सुंदर प्रेमकथेचा विषय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी प्रेमात पडावं असं वाटतंच. प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. काहींना त्यांचं प्रेम पहिल्या भेटीतचं गवसतं तर काहींना हुलकावणी देतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे पण ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एकासाठी लग्न म्हणजे केवळ एक व्यवहार आहे आणि दुसऱ्यासाठी लग्न म्हणजे संसार ! कसा रंगेल या प्रेमकहाणीचा करार ?

 

युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची कथा, “राधा प्रेम रंगी रंगली” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे २४ नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री कविता लाड – मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, वीणा जगताप, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपाराजीत मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
 
राधा ही आजची कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे जिचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. तर प्रेम व्यवहारचातुर्याने वागणारा, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणारा आणि ज्याचं लग्न, कुटुंब, प्रेमं याच्यावर मुळीच विश्वास नाही असा मुलगा आहे. अशी दोन परस्परविरोधी स्वभावाची ही दोन पात्र लग्नबंधनामध्ये अडकतात आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. आता हे लग्न त्यांना का करावे लागले ? कुठल्या परिस्थितीत हे लग्न झाले ? या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
 
या मालिकेच्या निमित्ताने व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी - व्हायाकॉम -18 चे निखिल साने म्हणाले, “कलर्स मराठीद्वारे प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीच्या गोष्टी सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे, घाडगे & सून मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. आता आम्ही प्रेक्षकांसमोर राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका घेऊन येत आहोत. मालिकेच्या शीर्षक गीताचे दिग्दर्शन राजेश मापुसकर यांनी केले जे अत्यंत फ्रेश, कलरफुल आणि युथफुल आहे. मालिकेचे दिग्दर्शन वीरेंद्र प्रधान करणार आहेत. आघाडीचे कलाकार आणि वेगळा विषय यामुळे आम्हाला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.  
 
कलर्स मराठीचे क्रिएटीव डिरेक्टर आणि मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान म्हणाले, “राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका माझ्यासाठी दिग्दर्शक म्हणून जास्त आनंद देणारी आहे. प्रेम आणि राधाची ही प्रेम कहाणी वास्तवदर्शी असून अत्यंत loveable अशी शूट होतोय याचा मला जास्त आनंद होतोय. अप्रतिम कलाकारांची फौज, सुरेख तंत्रज्ञ आणि कलर्स मराठीचा सुंदर paltform यामुळे ही मालिका प्रेक्षकांसाठी सुंदर ट्रीटच आहे असे मी म्हणेन”. 
 
या मालिकेच्या निमित्ताने कविता लाड म्हणाल्या, “ एखादी मालिका निवडताना त्याचे कथानक, भूमिका आणि त्याचबरोबर त्या मालिकेची टीम, दिग्दर्शक, सहकलाकार, निर्माता हे सगळेच महत्वाचे असते. राधा प्रेम रंगी रंगली मालिकेबद्दल बोलायचं झालं तर सगळचं उत्तम जमून आले आहे त्यामुळे मी खूप खुश आणि उत्सुक आहे. पुन्हाएकदा कलर्स मराठीसोबत काम करण्याचा योग जुळून आला आहे याचाही विशेष आनंद आहे.
 
मालिकेबद्दल तसेच भूमिकेविषयी बोलताना सचित पाटील म्हणाले, “एखादी कलाकृती स्वीकारताना भूमिका आणि कथानक मनाला भावणं अत्यंत महत्वाचं असतं, आणि मला राधा प्रेम रंगी रंगली मालिकेचे कथानक आणि माझी भूमिका या दोन्ही गोष्टी भावल्या. ज्या पद्धतीची मेहनत संपूर्ण टीम घेत आहे ते पाहता मला खात्री आहे प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल.”

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मालिकेचे काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...