आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  आज २४ नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेद्वारे एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, सचित पाटील आणि विणा जगताप. मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चांगलीच उत्सुकता निर्णाण केली आहे. राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधा आणि प्रेमची प्रेमकथा बघायला मिळणार आहे. मालिकेच्या शीर्षक गीताला सोशल मिडीयावर चांगलीच पसंती मिळत आहे. सहा लाखाहून अधिक प्रेक्षकांनी मालिकेचे शीर्षक गीत बघितले आहे आणि त्यांना ते आवडले देखील आहे.
 
मालिकेचे शीर्षक गीत सुंदर झालेच असून त्याला अजून सुंदरप्रकारे प्रेक्षकांच्या समोर सादर करण्याची जबाबदारी व्हेंटिलेटरसारखा उत्कृष्ट चित्रपट बनविणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित लेखक आणि दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी घेतली होती. गीताचे सुंदर बोल आणि श्रवणीय संगीत प्रेक्षकांना साद घालत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मालिकेच्या शिर्षकगीताचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...