Home »Bollywood »Marathi Cinekatta» Radhika Apte To Celebrate Diwali With Family

राधिकाला लागले कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचे वेध, काम संपवून परतणार भारतात !

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 12:11 PM IST

मुंबई - मराठी, हिंदी तसेच इंग्रजी चित्रपटातही यशोशिखरे गाठणारी अभिनेत्री म्हटली की डोळ्यासमोर नाव येते राधिका आपटेचे. एक सर्वगुणसंपन्न आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख असलेली राधिका सध्या लंडनमध्ये आहे. राधिकाने व्होग मासिकासाठी एक खास फोटोशूट केले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये राधिका स्टनिंग दिसत आहे. या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
राधिकाने नुकताच एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात तिने लवकरच भारतात परत असल्याचे सांगितले आहे. दिवाळीसाठी असलेली उत्सुकता तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून राधिका कामानिमित्त बाहेर आहे. पण आता तिने ही दिवाळी कुटुंबासोबत साजरी करण्याचे ठरवले आहे. आईसोबत फराळ बनवणे, आकाशकंदील तयार करणे, लहान भावासोबत किल्ला बनवणे यांसारख्या गोष्टी करण्यासाठी ती फारच उतावीळ झाल्याचे तिने सांगितले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, राधिका आपटेचे काही खास PHOTOS..

Next Article

Recommended