आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनायापासून दुरावलेल्या गुरुनाथने राधिकासाठी ठेवली सरप्राइज बर्थडे पार्टी, केक बघून लागेल ठसका!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या माझ्या नव-याची बायको या मालिकेला आता रंजक वळण मिळालंय. शनायामुळे दुखावलेला गुरुनाथ आता त्याची पत्नी राधिकाकडे परत जायचे आहे. पण स्वाभिमानी राधिका सहजासहजी गुरुनाथकडे परतण्यास तयार नाहीये. जोपर्यंत गुरुनाथ आपला आदर करत नाही, तोपर्यंत त्याच्याकडे परतायचं नाही, असं राधिकाने ठरवलंय. त्यातच आता राधिकाचा वाढदिवस आला आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने राधिका आणि गुरुनाथला एकत्र आणण्याचे गुरुच्या ऑफिसच्या मंडळींनी ठरवलंय. यासाठी आनंदने गुरुला राधिकासाठी सरप्राइज बर्थडे पार्टी प्लान करण्याचा सल्ला दिला आहे. अगदी तशी तयारीसुद्धा पूर्ण झाली आहे. राधिकासाठी गुरुने एक खास बर्थडे केक मागवला आहे. मसाल्यांच्या विश्वात राहणा-या राधिकासाठी गुरुने मागवलेला बर्थडे केक बघून सगळेच अवाक् झाले आहे. या केकमध्ये तिखट, मिर्ची, तेजपत्ता, दालचिनी यांची झलक बघायला मिळतेय. 

शनायाची काय असणार खेळी...
गुरुनाथला परत मिळवण्याचे आव्हान स्वीकारणारी शनायासुद्धा या बर्थडे पार्टीत सहभागी झाली आहे. राधिकाला आनंदी राहू न देण्याची जणू तिनेच शपथच घेतली आहे. त्यामुळे या पार्टीत शनाया नक्की विघ्नं आणणार, हे काही वेगळे सांगायला नको. राधिकाच्या बर्थडे पार्टीत शनाया आता कुठली नवी खेळी खेळणार, हे बघणं नक्कीच इंट्रेस्टिंग असणारेय. राधिकाच्या बर्थडे पार्टीचे सेलिब्रेशन प्रेक्षकांना 1 मे ते 3 मेच्या भागांत बघता येणारेय.  

पुढील स्लाईड्सवर बघा, राधिकाच्या बर्थडे पार्टीची एक छोटीशी झलक खास छायाचित्रांमध्ये... 
बातम्या आणखी आहेत...