आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षाच्या राहुलला डेट करतेय 31 वर्षीय मराठमोळी मुग्धा, पहिल्या पत्नीचा झाला आहे मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुर भांडारकच्या 'फॅशन' चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मुग्धा अभिनेता आणि बिझनेसमन राहुल देवला गेल्या तीन वर्षापासून डेट करत आहे. या दोघांच्या घरच्यांनाही यांचे नाते मान्य असून ते कधी लग्न करणार याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. राहुलला पहिल्या पत्नीचा झाला आहे मृत्यू..
 
24 वर्षाचा असताना राहुलने केले होते पहिले लग्न...
राहुल देव केवळ 17 वर्षाचा होता तेव्हा तो सर्वप्रथम त्याची पत्नी रिनाला भेटला होता. त्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी लग्न केले. त्यांचा सुखी संसार सुरु होता आणि त्यांना एक मुलगाही झाला. पण अचानक 2009 साली राहुलच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाला. राहूलने यानंतर स्वतःला कामात झोकून घेतले पण त्याच्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झाली जेव्हा मुग्धा त्याच्या आयुष्यात आली. 
 
राहुलचा मुलगा सिद्धार्थ राहतो लंडनमध्ये...
राहुलने सांगितले की रिनाच्या मृत्यूनंतर त्याचा सिंगल फादर जर्नीला सुरुवात झाली होती. त्याचा मुलगा हा अगदी लहानपणापासून फारच हुशार आहे त्यामुळे त्याला ते सर्व करताना काहीच प्रॉब्लेम आला नाही. रिनाचा मृत्यू झाला तेव्हा राहुलचा मुलगा सिद्धार्थ फक्त 11 वर्षाचा होता. सध्या तो लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. 
 
लग्नाची घाई नाही म्हणतेय मुग्धा गोडसे..
मुग्धाने नुकतेच राहुलसोबत तिचे असलेले रिलेशनशीप कबुल केले आहे. तिने सांगितले की, "राहुलसोबत असल्याची एक स्पेशल भावना मनात आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांना आमच्या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. सध्या लग्नाचा विचार केला नसून जेव्हा व्हायचे असेल तेव्हा लग्न होईल" असे तिने सांगितले. 
 
राहुल आणि मुग्धा नेहमी एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. मुग्धाच्या इन्सटाग्रामवर नजर टाकली असता तिचे अकाउंट राहुलसोबतच्या फोटोंनी भरलेले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा. या दोघांचे सोबतचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...