आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीतला नवीन Action Hero राकेश बापट, म्हणतोय, ‘जो मला नडला. मी त्याला फोडला’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितेश देशमुख, अंकुश चौधरीनंतर रिएलिस्टिक फिल्म कंपनी निर्मित ‘वृदांवन’ ह्या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीला आता अजून एक एक्शन हिरो मिळणार आहे. अभिनेता राकेश बापट ‘वृंदावन’मधून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतोय.
राकेशची ही जरी मराठी पहिली फिल्म असली, तरीही हिंदी मालिका पाहणा-या प्रेक्षकांसाठी तो नवीन नाही. ‘सात फेरे’, ‘एक पॅकेट उम्मीद’, ‘मर्यादा’, ‘होंगे जुदा ना हम’, ‘नच बलिये’, ‘कुबुल है’ मधून गेली १० वर्ष राकेशने हिंदी टेलिव्हीजनमध्ये आपला ठसा उमटवलाय. ‘तुम बीन’,‘दिल वील प्यार व्यार’, ‘हिरोइन’ ह्या हिंदी चित्रपटांमधूनही राकेश दिसलाय. आता मराठीत तो ‘वृंदावन’मधून दमदार एन्ट्री घेतोय, हे त्याच्या फिल्मच्या फस्ट लूक प्रोमोमधून दिसून येतंय.
‘जो मला नडला. मी त्याला फोडला’ ह्या त्याच्या डायलॉगनेच प्रोमोची सुरूवात होतेय. त्यानंतरच्या त्याच्या फाइट सिक्वेन्समधून हा मराठीतला नवा एक्शन हिरो असल्याचंच स्पष्ट दिसतंय.
हिंदीत १५ वर्ष काम केल्यावर अचानक मराठीत का यावंस वाटलं, असं विचारल्यावर राकेश म्हणतो, “खरं तर मी कधीच कोणती गोष्ट विचारपूर्वक केली नाही. चांगल्या उंची आणि देहयष्टीमूळे मॉडलिंगच्या ऑफर्स आल्या. गंमत म्हणून १९९९ला मिस्टर इंडिया स्पर्धेत गेलो. तिथे जिंकलो. मॉडेलिंग करता-करता ‘तुम बिन’ ह्या हिंदी सिनेमाची ऑफर आली, त्यानंतर हिंदी चित्रपट मिळत गेले. २००५ला ‘सात फेरे’ ऑफर झाली. त्यानंतर हिंदी मालिका मिळत गेल्या. जशी कामं मिळाली, तशी केली. करीयर कधीच प्लॅन केलं नाही. आणि आता अचानक मराठी सिनेमाची ऑफर आली तर ही फिल्म सूध्दा केली.”
‘वृंदावन’मधून मराठी चित्रपटात डेब्यू करणा-या राकेशने समीत कक्कडच्या ‘आयना का बायना’मध्ये गेस्ट अपिअरन्स दिला होता. राकेश त्याविषयी सांगतो, “समीतने सूध्दा अचानक विचारलं, म्हणून मैत्रीखातर गेस्ट अपिअरन्स दिला. तेव्हाही इथून पूढे कदाचित आपल्याला मराठीत करीयर करायचंय हे ध्यानीमनीही नव्हतं.”
राकेशने आपल्या करीयरचं प्लॅनिंग न करण्याचा त्याला फटकाही चांगलाच बसलाय. त्याची कबूली देत राकेश म्हणतो, “आज मी नवोदित मुलांना पाहतो. ते एक्टिंग, फाइटिंग, डान्सिंगची ट्रेनिंग घेतात. मी जर असं शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलं असतं. तर आज कदाचित मी करीयरमध्ये खूप नाव कमावलं असतं. पण आता इथून पूढे नीट विचार करून ऑफर घेण्याचा निश्चय केलाय.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ‘वृंदावन’ सिनेमाचा प्रोमो
बातम्या आणखी आहेत...