आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: \'तुझ्यात जीव रंगला\'च्या सेटवर चंदाने राणाला तर वहिनीसाहेबांनी क्रू मेंबर्सला बांधली राखी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदा आणि वहिनीसाहेबांचे राखी सेलिब्रेशन - Divya Marathi
चंदा आणि वहिनीसाहेबांचे राखी सेलिब्रेशन
7 ऑगस्ट रोजी सगळीकडे रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा झाला. सामान्यांसोबतच मराठी कलाकारांनीही आपल्या बहीणभावंडांसोबत हा सण साजरा केला. मात्र 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील कलाकारांना शूटिंगच्या बिझी शेड्युलमुळे या सणाच्या निमित्ताने घरी जाता आले नाही. मग काय या कलाकारांनी मालिकेच्या सेटवरच या सणाचे सेलिब्रेशन केले.
 
मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि सतत तिच्यासोबत राहणारी चंदा अर्थात अभिनेत्री दिप्ती सोनावणे यांनी मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांसोबत हा सण साजरा केला. दिप्तीने राणा म्हणजेच हार्दिक जोशीला राखी बांधली तर धनश्रीने मालिकेच्या क्रू मेंबर्सना राखी बांधली. या मालिकेच सध्या कोल्हापूर येथे शूटिंग सुरु आहे. 

धनश्रीने या सेलिब्रेशनचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करुन लिहिले,  "Rakhi pornima... Miss u Saurabh Kadgaonkar. Thank u kolhapur... U have given me lods of friends who truly care for me like a brother... Lods of love to u all.."

तर दिप्तीने हार्दिकला राखी बांधतानाचे फोटोज शेअर करुन लिहिले, "Happyyy Rakshabandhan bhawanoooo...#Rana #Barkat #Rohit #Miss u Amit n dada"

धनश्री आणि दिप्ती या दोघींनीही यावेळी त्यांच्या सख्ख्या भावांना मिस केले. धनश्रीला एक थोरला भाऊ असून सौरभ काडगावकर हे त्याचे नाव आहे. सौरभ शास्त्रीय गायक आहे. तर दिप्ती मुळची पुण्याची असून तिला दोन भाऊ आहेत. 

पाहुयात, 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवर झालेल्या राखी पौर्णिमेच्या सेलिब्रेशनचे खास फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...