आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भेटा मराठी सेलिब्रिटींच्या नॉन-फेमस बहीणभावंडांना, क्वचितच येतात कॅमे-यासमोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठी बहीण श्वेतासोबत प्रिया बापट - Divya Marathi
मोठी बहीण श्वेतासोबत प्रिया बापट
एन्टरटेन्मेंट डेस्कः आज सगळीकडे रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सामान्यांप्रमाणेच हिंदी आणि मराठी सेलिब्रिटीसुद्धा हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. मात्र मराठी इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटींना सख्खे बहीणभाऊ नाहीयेत. त्यामुळे इंडस्ट्रीतील आपल्या मानलेल्या बहीणभावांसोबत ते हा सण साजरा करतात. तर काही सेलिब्रिटींना सख्खा भाऊ नाही, तर काहींना सख्खी बहीण नाही. काही सेलिब्रिटी मात्र नशीबवान आहेत, ज्यांना सख्खे बहीण भाऊ आहेत. आज रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधत आम्ही तुमची भेट घालून देतोय, मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या पडद्यामागे राहणा-या बहीणभावांसोबत. या सेलिब्रिटींचे बहीण भाऊ कॅमे-यामागेच राहणे पसंत करतात.

अभिनेत्री प्रिया बापट हिला एक मोठी बहीण असून तिचे नाव श्वेता आहे. श्वेता ड्रेस डिझाइनर आहे. तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिलासुद्धा एक सख्खी बहीण आहे. आदिती हे तिचे नाव. आदितीचे लग्न झाले असून ती परदेशात स्थायिक आहे. आदिती व्यवसायाने एअर होस्टेस आहे. अमृताच्या सोशल मीडियावर पेजवर तिची आदितीसोबतची अनेक छायाचित्रे बघायला मिळतात. या दोघी बहिणींमध्ये स्ट्राँग बाँडिंग आहे. या दोघीही चुलत भावांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकरसह आणखी काही सेलेब्सच्या बहीणभावंडांना...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...