आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athavale Does Gabbar Sing Act In Chala Hawa Yevu Dya

‘चला हवा येऊ द्या’मध्ये रामदास आठवले बनले गब्बरसिंग, विचारताय, “अरे, ओ सांबा कितने आदमी है?’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘चला हवा येऊ द्या’च्या सोमवारच्या भागात रामदास आठवले, नीतीन सरदेसाई आणि नारायण राणे हे राजकिय नेते आलेले दिसणार आहेत. नेहमी राजकीय मंचावर एकमेकांची उणीदूणी काढणारी ही लोकं कोणालाही टोमणे न मारता अख्ख्या महाराष्ट्राला हसवणार आहेत.
रामदास आठवले आले, की त्यांनी काहीतरी चारोळी साजर करणं अपेक्षितच आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये त्यांनी स्वत:वरच चारोळी केली.
आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव
मीच जिंकणार आहे आजचा डाव
आपल्या दुश्मनावर घालणार आहे मी घाव
कारण आठवले आहे माझं नाव
अशी त्यांनी स्वत:वरच कविता केली. हे काय कमी होतं, तर त्यांनी आठवलेशैलीत ‘शोले’तल्या गब्बरची भूमिकाही केली. गब्बरचा ‘कितने आदमी है’ हा डायलॉग म्हणण्याशिवाय, गब्बर सादर करताना त्यांनी आपल्या स्टाइलमध्ये कविता सादर केली.
अगर कोई लेगा मेरे साथ पंगा
तो मैं कर दूँगा तुझे नंगा
अगर कोई अपमान करेंगा मेरे निले रंगा
तो मैं गाव में आकर करूँगा दंगा
अशी त्यांनी अफलातून चारोळी सादर केल्यावर टाळ्या आणि शिट्या आल्या नसत्या तरच नवलं. त्यांच्यावर सागर कारंडे, श्रेया बुगडे, विनीत भोंडे, भाऊ कदमने ‘मला बी जत्रेला येऊ द्या की’ स्टाइलमध्ये गाणं सादर केलं.
तर नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ने पत्र पाठवलंय. आणि ते पोस्टमन बनलेल्या सागर कारंडेंने त्यांना वाचून दाखवलेलं आपण पाहणार आहोत. त्यांच्यावरही एक खास गामं साजर करण्यात आलंय. कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, विनित भोंडे, भाऊ कदम, सागर कारंडेने त्यांच्यासाठी ‘गण्या धाव रे’च्या थाटात गाणं सादर केलं.
नितीन सरदेसाई यांच्यासाठी थुकरटवाडीच्या बॅंडने ‘पळते भैय्ये पाहूया मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणं सादर करत धम्माल उडवून दिली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रामदास आठवले ह्यांनी केलेले गब्बर सिंगचे स्किट