आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलची चुलत बहीण तर करण जोहरची वहिनी आहे राणी मुखर्जी, हे आहे सेलेब्सचे एकमेकांशी नाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट आहे. कुणाचे मैत्रीचे संबंध आहेत. काहींचे नाते प्रेमाचे आहे, तर काहींमध्ये शत्रुत्व आहे. मात्र बॉलिवूडमध्ये काही कुटुंब अशी आहेत, ज्यांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध आहेत. या नात्यांविषयीत्यांच्या चाहत्यांना फार काही ठाऊक नाहीये. उदाहरणार्थ काजोल ही अभिनेत्री नूतनची भाची आणि अभिनेता मोहनिश बहलची मावस बहीण आहे. मोहनिश बहल हा नूतन यांचा मुलगा आहे. काजोल आणि राणी मुखर्जी या दोघी सख्ख्या चुलत बहिणी आहेत. तर दिग्दर्शक अयान मुखर्जीसुद्धा काजोल आणि राणीचा चुलत भाऊ आहे.
 
काजोल, राणी आणि अयानचे वडील आहेत भाऊ-भाऊ  
काजोलचे वडील सोमू मुखर्जी, अयानचे वडील देव मुखर्जी, राणीचे वडील राम मुखर्जी, शर्बानी मुखर्जीचे वडील रोनू मुखर्जी हे सख्खे चार भाऊ आहेत. या नात्याने हे सर्व सेलिब्रिटी एकमेकांचे नातेवाईक आहेत. तर मोहनिश बहल अभिनेत्री नूतन यांचा मुलगा आहे. नूतन आणि काजोलची आई तनुजा या दोघी सख्ख्या बहीण होत्या. या नात्याने काजोल आणि मोहनिश बहलसुद्धा बहीणभावंड आहेत.  
 
करण जोहरची वहिनी आहे राणी मुखर्जी 
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि करण जोहर यांचेही खास नाते आहे. राणीचे सासरे यश चोप्रा हे करण जोहरचे सख्खे मामा होते. करण जोहरची आई हीरु जोहर निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांची धाकटी बहीण आहे. याचा अर्थ म्हणजे आदित्य चोप्रा आणि करण जोहर भाऊ असून आदित्यची पत्नी राणी मुखर्जी करण जोहरची वहिनी आहे. अशाप्रकारे बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचे कुणाशी कोणते तरी नातेसंबंध नक्की आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बी टाऊनमधील अशाच आणखी काही नातेसंबंधांविषयी...
बातम्या आणखी आहेत...