आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केले बेडरुम सिक्रेट्स, 7 वर्षांपासून निभावत आहेत साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता राकेश बापटचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 सप्टेंबर 1978 रोजी मराठी कुटुंबात राकेशचा जन्म झाला. 'वृंदावन' या चित्रपटानंतर राकेश लवकरच 'राजन' या मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात तशी बॉलिवूडमधून झाली होती. 2001 साली आलेला 'तूम बिन' हा राकेशचा पहिला चित्रपट आहे. त्यानंतर तो अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकला. 'मर्यादा', 'सात फेरे', 'होंगे जुदा ना हम' या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे. 
 
प्रसिद्ध अभिनेत्री आहे पत्नी...
हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धी डोगरा ही राकेशची पत्नी आहे. या दोघांची भेट मर्यादा या मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. येथेच त्यांचे सूत जुळले आणि 2011 साली हे दोघे विवाहबद्ध झाले. याचवर्षी 29 मे रोजी त्यांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. राकेश आणि रिद्धीची इंडस्ट्रीतील क्यूट कपलमध्ये गणना होते. दोघांच्या लग्नाला सात वर्षांचा काळ लोटला असला तरी दिवसेंदिवस दोघांमधील नाते आणखी दृढ होत चालले आहे. एका लीडिंट एंटरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राकेशची पत्नी रिद्धीने त्यांचे बेडरुम सीक्रेट्स शेअर केले होते.
 
जाणून घेऊयात, बेडरुम सीक्रेट्स शेअर करताना काय सांगितले रिद्धीने... 
बातम्या आणखी आहेत...