आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रात्रीस खेळ चाले'चा शेवट उलगडला... व्हॉट्स अॅपवरुन फुटले मालिकेचे रहस्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – कोकणातील नाईक कुटुंब, त्यांचा वाडा, त्या वाड्यात घडणा-या गूढ गोष्टी, त्या मागचं रहस्याचं वलय आणि त्यातून मनात निर्माण होणारी भीती हा असा उत्कंठावर्धक खेळ घेऊन गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अतिशय वेगळ्या धाटणीचं कथानक, वेगवान पद्धतीने पुढे सरकणारी गोष्ट आणि सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मालिका आता शेवटाकडे वाटचाल करत असताना या मालिकेतील नेने वकील आणि अजयचा खरा खुनी कोण असेल यासंदर्भात प्रेक्षकांमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील गूढ नेमकं काय आहे? खुन कुणी केले आहेत? या सारखे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. या मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत हे गूढ कायम ठेवण्यात निर्मात्यांना यश आले आहे. मात्र, सध्या सोशल मीडियात काही फोटोज व्हायरल होत आहेत. या फोटोंनुसार, सुषमा उर्फ सुशल्या आणि माधवाची बायको निलीमा यांच्या हातात बेड्या घालून नेताना दिसत आहे. म्हणजेच नेने वकील आणि अजय यांचे खुन यांनीच केले असल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या फोटोंनुसार सुषमा आणि निलीमा यांनी खुन केल्याच दिसत असलं तरी हे खुन करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? निलिमाने सुषमाला का साथ दिली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व उपस्थित होणा-या या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षकांना या मालिकेचा शेवटचा भाग पहावा लागणार आहे हे नक्की.रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर त्या मालिकेच्या वेळेत ‘हंड्रेड डेज’ ही रहस्यमय मालिका सुरु होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, या मालिकेचे आणखी काही ऑनलोकेशन फोटोज... आणि सोबतच वाचा सलग पन्नास दिवस कोकणात राहून चित्रीकरण करणारी पहिलीच मालिका...
बातम्या आणखी आहेत...