एंटरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 सप्टेंबर 1966 रोजी मुंबईतील एका अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रवी यांनी अभिनेता म्हणूनही आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज झालेल्या कच्चा लिंबू चित्रपटातून रवी जाधव एका नव्या भूमिकेत म्हणजे अॅक्टर म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आले. त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुकदेखील झाले.
'कच्चा लिंबू' चित्रपटात रवी जाधव यांची भूमिका पाहून ते अॅक्टर म्हणूनही तेवढेच ताकदीचे असल्याचे पाहायला मिळते. पण दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांची एक वेगळीच शैली आहे. त्यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या सहाही चित्रपटांमध्ये वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळाली. मनोरंजन करतानाच एखाद्या सामाजिक विषयाला कशाप्रकारे लोकांसमोर मांडता येते याचे उत्तम उदाहरणही त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या याच चित्रपटांबाबत आपण आज जाणून घेणार आहोते.
पुढील स्लाइड्सवर, रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांविषयी...