आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टाइमपास 2\'नंतर दिग्दर्शक रवी जाधवांचा नवा सिनेमा \'न्यूड\', पहिले पोस्टर रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत प्रसिध्दीस आलेले नाव म्हणजे रवी जाधव... 'नटरंग', 'बालगंधर्व', 'बीपी', 'टाइमपास' आणि अलीकडेच रिलीज झालेल्या 'टाइमपास 2' या दर्जेदार एकाहून एक सुपरहीट सिनेमे देणारे रवी जाधव कोणता नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता स्वतः रवी जाधवांनी प्रेक्षकांची ही उत्सुकता संपवली आहे. पुढील वर्षी ते एक नवीन कलाकृती घेऊन येत आहेत. याची माहिती रवी यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. त्यांच्या या नव्या कलाकृतीचे नाव आहे ''न्यूड''.
या नवीन सिनेमाचे एक पोस्टर त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहे. शिवाय आपल्या नवीन कलाकृतीची माहिती देताना त्यांनी लिहिले, ''बॅंजो या माझ्या पहिल्या हिन्दी सिनेमाची तयारी जोरात चालू आहे पण त्याच बरोबर मी दिग्दर्शित करीत असलेल्या माझ्या पुढच्या मराठी चित्रपटाचे कामही गेल्या 8-9 महिन्यांपासून सुरु आहे. नाव पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल की विषय वेगळा आहे, काम कठीण आहे पण म्हणूनच ते करायचा हा एक प्रयत्न आहे. सादर आहे माझ्या पुढच्या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर… यातील कलाकार, तंत्रज्ञ यांची नावे व इतर माहिती लवकरच जाहीर होतील...तुमच्या सदिच्छा व आशीर्वाद सदैव असेच पाठीशी राहू दे!!!''
सिनेमाच्या शीर्षकावरुन रवी यांनी वेगळ्या विषयाची हाताळणी केली, हे नक्की. आता या सिनेमात कोणकोणते चेहरे झळकणार, या सिनेमाचा नेमका विषय कोणता, हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणारेय.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, रवी जाधव यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट...