आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा येऊ द्या\' च्या मंचावर आली रविना टंडन, थुकरटवाडीच्या मंडळीसोबत धरला ठेका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडननं चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली आहे. ती‘मातृ’या हिंदी चित्रपटातून लवकरच  कमबॅक करतेय. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली. येत्या मंगळवारी 18 एप्रिलला रात्री 9.30 वाजता हा भाग प्रसारित होणार आहे. तर सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत.

कुशल बद्रिके आणि भाऊ कदमबरोबर रविनानं गाण्यांवर ठेकाही धरला. यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती. रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाना तिने खळखळून दादही दिली पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने रविनालासुध्दा भावनिक केले. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...