आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Life Couple Anuja And Saurabh To Be Reel Life Couple

सिल्व्हर स्क्रिनवर पहिल्यांदाच दिसणारेय ही रिअल लाइफ जोडी, जाणून घ्या या क्यूट कपलबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी अनुजासोबत सौरभ गौखले - Divya Marathi
पत्नी अनुजासोबत सौरभ गौखले
एन्टरटेन्मेंट डेस्कः खऱ्या आयुष्यातल्या अनेक जोडीदारांनी आजवर रुपेरी पडद्यावर एकत्र काम केलं आहे. या यादीत आणखी एका जोडीची भर पडली आहे. अभिनेता सौरभ गोखले व अभिनेत्री अनुजा साठे ही जोडी 22 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘भो भो’ या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ऑन स्क्रिनवर दिसणार आहेत. लग्नानंतर प्रथमच अभिनेता सौरभ गोखले व त्याची पत्नी अनुजा या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.
‘योद्धा’,‘शिनमा’, ‘परतु’ या सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या सौरभ व सध्या गाजत असलेल्या 'तमन्ना' या मालिकेत हटके भूमिका साकारणाऱ्या अनुजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असून आपल्या पहिल्या एकत्रित सिनेमाबद्दल हे दोघंही तितकेच उत्सुक आहेत. चांगली कथा असल्यामुळे या सिनेमाला आम्ही होकार दिल्याचे सांगत हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल असा विश्वास या दोघांनीही बोलून दाखवला.
‘सुमुखेश फिल्म्स’ प्रस्तुत आणि भरत गायकवाड निर्मित- दिग्दर्शित ‘भो भो’ हा सस्पेन्स थ्रिलर असून तो विनोदी शैलीत मांडण्यात आला आहे. या सिनेमात या दोघांसोबत प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संजय मोने, किशोर चौगुले अशी तगडी स्टारकास्ट आहे. रिअल लाईफ दाम्पत्याची रील लाईफ केमिस्ट्री कशाप्रकारे रंगणार हे पडद्यावर पहाणे उत्सुकतेचं ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अनुजा-सौरभ स्टारर 'भो भो' या सिनेमाचा मोशन पोस्टर व्हिडिओ आणि सोबतच पाहा या क्यूट कपलच्या लग्नाचे खास फोटोज...