आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेक लागू यांच्यानंतर आता झळकले मुलीचे दुःख, रिमा लागू यांच्या निधनानंतर म्हणाली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई रिमा लागूसोबत मृण्मयी लागू - Divya Marathi
आई रिमा लागूसोबत मृण्मयी लागू
मुंबईः मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांच्या निधनामुळे त्यांची मुलगी मृण्मयी लागू हिला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच रिमा यांचे पती विवेक लागू यांनी एका मुलाखतीत त्यांच्या निधनापुर्वी नेमके काय घडले होते, हे सांगितले होते. त्यांच्यानंतर आता मृण्मयीने एका मुलाखतीत आईच्या निधनाविषयी म्हटले, "मी माझ्या आईला खूप कमी वयात गमावले आहे. ब-याच काळापासून तिच्याशी माझे बोलणे झाले नव्हते आणि आता तिचे अकाली निघून जाणे, हे पचवणे माझ्यासाठी खूप कठीण आहे."  Ex-हसबंडने सांगितले, घोरता-घोरता झोपेतच झाला रिमा लागू यांचा मृत्यू
 
मुलीसाठी मैत्रिणीसारख्या होत्या रिमा...
- मृण्मयीने सांगितले, "माझी आई माझी बेस्ट फ्रेंड होती. एवढ्या लवकरच आईला गमवावे लागेल, याचा विचारही कधी मी केला नव्हता. तिची पोकळी कुणीही भरुन काढू शकत नाही."
- "मी देवाकडे तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करते. पुढच्या जन्मात देव तिला याही पेक्षा अधिक प्रसिद्धी देवो."
- 18 मे रोजी छातीत दुखत असल्याने रिमा यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 

पुढील 2 स्लाइड्समध्ये वाचा, मृण्मयी लागू हिच्याविषयी...   
बातम्या आणखी आहेत...