Home »Bollywood »Marathi Cinekatta» Rekha Bhardwaj Marathi Song For Movie Lapachapi

मराठी भयपट 'लपाछपी'साठी रेखा भारद्वाज यांनी जादुई आवाजात गायली अंगाई

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 15:43 PM IST

मुंबई - मराठी सिने संगीताच्या आकर्षणाने हिंदीतील सुप्रसिद्ध गायक-गायिका मराठीत गाताना दिसत आहेत, 'इश्कीया' फेम हिंदीच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका रेखा भारद्वाज या देखील त्याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या 'लपाछपी' या सिनेमातील अंगाईला त्यांचा आवाज लाभला आहे. 'एक खेळ लपाछपीचा...' असे बोल असलेल्या या अंगाई गीताचे भारद्वाज स्टुडियोमध्ये, नुकतेच रेखाजीच्या आवाजात रेकॉर्डींग करण्यात आले.
मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर यांची निर्मिती असलेला हा हॉंरर सिनेमा असून, याचे दिग्दर्शन लेखन विशाल फुरिया यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर या जोडीने सिनेमाचे लेखन केले आहे.
येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, गायिका रेखा भारद्वाज यांचे काही PHOTOS..

Next Article

Recommended