आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डॉ. तात्या लहाने..' चित्रपटही जाणार गिनीज बुकात, करणार रिले सिंगिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - डॉ. तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारा 'डॉ. तात्या लहाने - अंगार : पॉवर इज विदीन' हा सिनेमा 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नामवंत कलाकारांचा कसदार अभिनय चित्रपटात पाहायला मिळेल. दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले आहे. या चित्रपटासाठी रिले सिंगिंक केली जाणार असून, त्यासाठी महाराष्ट्रातील 324 गायकांची निवड केली आहे. या रिले सिंगिगंची गिनीज बुकात नोंद केली जाणार आहे. 
 
सात ते सत्तर वर्षापर्यंतचे गायक या रिले सिंगिंगसाठी सज्ज झाले आहेत. कोल्हापूरचे आमदार सुजित मिंचेकर यांचादेखील 324 गायकांमध्ये समावेश असणार आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या ऑडिटोरियममध्ये 16 ऑगस्ट रोजी रिले सिंगिंग होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. मकरंद अनासपुरे आणि अलका कुबल यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वतः लिहिले असून संगीत एक हिंदुस्थानी याने दिले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, चित्रपटातील गाण्याबाबत..
 
 
बातम्या आणखी आहेत...