आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS : \'बाई वाड्यावर या\' असे फरमावणा-या या अस्सल खलनायकाचे खरे नाव नव्हते \'निळू\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील जातीवंत कलाकार अशी ओळख मिळवलेल्या व मराठी रसिक प्रेक्षकांवर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते निळू फुले यांनी 13 जुलै 2009 म्हणजेच बरोबर आठ वर्षापूर्वी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांना जाऊन आठ वर्षांचा काळ लोटला असली तरी निळू फुलेंचा करारी आवाज रसिकांच्या मानत कायम आहे.
 
जब्बार पटेलांच्या सिंहासन, सामना यातील भूमिकांनी निळूभाऊंनी दर्जेदार अभिनेते असल्याचे दाखवून दिले. चार दशकाच्या कारकिर्दीत मराठी-हिंदी अशा सुमारे दीडशे चित्रपटात त्यांनी काम केले. सखाराम बाईंडर या मराठी नाटकाने तर निळूभाऊंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. 

भाजीपाला आणि लोखंड विकणा-या घरात जन्म झाला असला तरी आपल्या कर्तृत्त्वाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्ठीत निळूभाऊंनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला. 'बाई वाड्यावर या' या पाटलांच्या भूमिकेतील डायलॉग तर आजही लोकांच्या मनामनात राहिला आहे. आपली भूमिका ठामपणे वठविणारे निळूभाऊंना महिलांचा रोष मात्र कायम पत्करावा लागला होता.

करारी व्यक्तिमत्त्व असलेल्या निळू फुलेंच्या आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी त्यांच्या चाहत्यांना अद्याप ठाऊक नाहीत, चला तर मग जाणून घेऊयात कसे होते निळूभाऊंचे आयुष्य...  
बातम्या आणखी आहेत...