आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance : गौतम राजाध्यक्ष यांच्या कॅमे-यात टिपल्या गेलेली मराठी स्टार्सची खास झलक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एंटरटेन्मेंट डेस्कः गौतम राजाध्यक्ष ‘स्टार फोटोग्राफर’ म्हणून प्रसिद्ध होते. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. 13 सप्टेंबर 2011 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती.  गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून अनेक सेलिब्रिटींनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात फोटोसेशन करुन घेतले होते. यामध्ये हिंदीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.
 
अगदी स्मिता पाटील, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यापासून ते सोनाली कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, तारा देशपांडे, मीता सावरकर यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी गौतम राजाध्यक्षांकडून फोटोसेशन करुन घेतले होते. गौतम यांनी क्लिक केलेल्या फोटोमुळेच धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह अनेक अॅक्ट्रेसला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली होती, असेही म्हटले जाते. मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुळकरने गौतम राजाध्यक्षांकडूनच फोटोग्राफीचे धडे गिरवले आहेत. 

अभिनेता आदिनाथ कोठारेचे खास फोटोसेशन गौतम राजाध्यक्षांनी केले होते. त्या फोटोशूटच्या आठवणींना उजाळा देताना आदिनाथ म्हणाला होता,  "गौतम राजाध्यक्ष यांनी आपले फोटो काढावेत अशी अनेकांची इच्छा असायची. पण हे स्वप्नं पूर्ण होणे हे सगळ्यांसाठी शक्य नसते. पण मला त्यांच्यासोबत फोटोशूट करायला मिळाले होते. माझे त्यांनी काढलेले फोटो खूपच सुंदर आले होते. "
 
तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने 20 वर्षांपूर्वी गौतम यांच्याकडून फोटोसेशन करुन घेतले होते. या फोटोशूटमध्ये सोनाली व्हाइट आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय. काही फोटोजमध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत.

गौतम राजाध्यक्ष यांच्याविषयी... 
 - गौतम यांनी क्लिक केलेले फोटो आपल्याशी बोलतात, असेही म्हटले जाते. त्यांनी खर्‍या अर्थाने इंडियन फोटोग्राफीला आंतरराष्‍ट्रीय ग्लॅमर दिला होता. ते एक लेन्समनसोबतच लेखक, टीकाकार आणि सांस्कृतिक चिंतकही होते. त्यांनी नवोदित फोटोग्राफर्सला मार्गदर्शन केले. त्यांना दिशा दाखवली.
- मुंबईतील सेंट झेव्हियर कॉलेजमधून त्यांनी केमेस्ट्रीमध्ये पदवी घेतली. इतकेच नाही तर त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून दोन वर्षे नोकरीही केली. 1974 मध्ये ते जाहिरात एजन्सी 'लिंटास'चे फोटो सर्व्हिस डिपार्टमेंटचे विभागाध्यक्ष बनले.
- गौतम राजाध्यक्ष यांनी 'बेखुदी' आणि 'अंजाम' या हिंदी चित्रपटांसोबतच संजय सुरकर दिग्दर्शित 'सखी' या चित्रपटाची कथा लिहिली होती. 'सखी' या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. गौतम राजाध्यक्ष यांनी 13 सप्टेंबर 2011 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... गौतम राजाध्यक्ष यांन  त्यांच्या कॅमेर्‍यात  शूट केलेले मराठी स्टार्सचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...