आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेणुका शहाणेच नव्हे तर या 12 मराठी सेलिब्रिटींनीही केले INTER CAST मॅरेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः म्हणतात ना प्रेम धर्म, जातपात किंवा वय बघून होत नसतं. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा जातीपातीची बंधन झुगारुन प्रेम केले. फक्त प्रेमच नाही तर पुढे लग्न करुन हे सेलिब्रिटी गुण्यागोविंदाने आपला संसारसुद्धा करत आहेत. बॉलिवूडमध्ये एखाद्या सेलिब्रिटीने दुस-या जातीच्या तरुण-तरुणीची जोडीदाराच्या रुपात निवड केल्याची अनेक उदाहरणे आपल्या बघण्यात आली आहेत. बॉलिवूडच नव्हे तर अनेक मराठी इंडस्ट्रीतील अनेक जणांनी जातीपातीच्या बंधनांना दूर ठेवत दुस-या धर्मातील व्यक्तीची जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. यापैकी कुणी ख्रिश्चन, कुणी मुस्लिम, तर कुणी पंजाबी तरुण-तरुणींसोत संसार थाटला आहे. विशेष म्हणजे अनेकांना कुटुंबीयांच्या विरोधालासुद्धा सामोरे जावे लागले. तर काहींनी चक्क पळून जाऊन लग्न केले. 
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील कोणकोणत्या सेलिब्रिटींनी आंतरजातीय विवाह केला, याची खास माहिती सांगत आहोत...
  
अभिनेत्री रेणुका शहाणे 
पती - अभिनेते आशुतोष राणा   

'सुरभी’ या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री रेणुका शहाणेचा आज (07 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. रेणुकाचे लग्न हिंदी भाषिक आशुतोष राणांसोबत झाले आहे. आशुतोष राणा यांचे मोठे कुटुंब आहे. त्यांना पाच बहिणी आणि सात भाऊ. आशुतोष विषयी रेणुका सांगते, राणाजी अत्यंत प्रामाणिक आणि कमिटेड व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या स्वभावाबद्दल काही प्रश्नच नव्हता. माझ्या फिल्मस, टी.व्ही. करिअरला त्यांचा विरोध नाही. आमच्या गुरुनं मला एक मंत्र दिला आहे. तो असा, की आशुतोष रागावला तर लगेच प्रत्युत्तर देऊ नको. त्याचा राग शांत झाल्यावर तुझं म्हणणं सांग. 
 
खरं तर आशुतोष राणा यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील एका छोट्या गावातील आहे. आशुतोष यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतल्याने रेणुकाचे वडील आनंदी होते. मात्र तिच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. त्याचे कारण म्हणजे दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. शिवाय आशुतोष यांचे कुटुंब बारा जणांचे आहे. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2001 मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
 
रेणुकाप्रमाणेच आणखी कोणकोणत्या मराठी सेलिब्रिटींनी भिन्न सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या तरुण-तरुणींशी विवाह केला, कशी सुरु झाली त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात, पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...